अश्विन ‘आयएलटी २० लीग’ खेळण्यासाठी इच्छुक; लिलावात सहभागी होण्यासाठी बोलणे सुरू

आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्ती स्विकारलेला भारताचा दिग्गज फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने आयएलटी२० मध्ये खेळण्यासाठी रस दाखवला आहे.
अश्विन ‘आयएलटी २० लीग’ खेळण्यासाठी इच्छुक; लिलावात सहभागी होण्यासाठी बोलणे सुरू
Published on

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्ती स्विकारलेला भारताचा दिग्गज फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने आयएलटी२० मध्ये खेळण्यासाठी रस दाखवला आहे. आयएलटी२० चा आगामी हंगाम २ डिसेंबर ते ४ जानेवारी २०२६ या कालावधीत यूएईमध्ये होणार आहे. या स्पर्धेच्या लिलावात सहभागी होण्यासाठी तो प्रयत्नशील आहे.

पुढच्या काही आठवड्यांत भारताचा हा दिग्गज फिरकीपटू ३९ वर्षांचा होणार आहे. अश्विनने अलिकडेच आयपीएमधूनही निवृत्ती स्विकारली आहे. त्यामुळे जगातील अन्य फ्रँचायझी आधारित टी-२० लीग तो खेळू शकतो.

क्रिकेटच्या सर्व प्रकारांमध्ये सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये अश्विन दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने २८७ आंतरराष्ट्रीय सामन्यांत ७६५ फलंदाजांना बाद केले आहे.

आयोजकांशी माझे बोलणे सुरू आहे. जर लिलावासाठी माझ्या नावाची नोंद केल्यास मला खरेदीदार मिळेल, अशी आशा अश्विनने व्यक्त केल्याचे वृत्तसंस्थेतर्फे सांगण्यात आले.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटसह आयपीएलमध्येही या अष्टपैलू खेळाडूने आपली चमक दाखवली आहे. आंतरराष्ट्रीय आणि आयपीएलमधील निवृत्तीनंतर हा खेळाडू जगभरातील टी-२० लीग खेळताना दिसण्याची शक्यता आहे.

३० सप्टेंबरला लिलाव

स्पर्धेचा लिलाव ३० सप्टेंबर रोजी दुबई येथे होणार आहे. तर त्यासाठी नावे नोंदवण्याची अंतिम मुदत १० सप्टेंबर आहे. यंदा प्रथमच आयएलटी२० स्पर्धा लिलाव पद्धतीने होत आहे. यापूर्वीच्या हंगामात ड्राफ्ट पद्धतीने खेळाडूंची निवड केली जात होती.

logo
marathi.freepressjournal.in