अश्विन आता बुद्धिबळाच्या पटावर

रविचंद्रन अश्विनची गणना जगातील तारांकित फिरकीपटूंमध्ये केली जाते. अश्विनच्या फिरकीच्या बळावर भारतीय संघासाठी अनेक सामने जिंकले आहेत.
अश्विन आता बुद्धिबळाच्या पटावर
Published on

नवी दिल्ली : रविचंद्रन अश्विनची गणना जगातील तारांकित फिरकीपटूंमध्ये केली जाते. अश्विनच्या फिरकीच्या बळावर भारतीय संघासाठी अनेक सामने जिंकले आहेत. अश्विनचा कॅरम बॉल खेळणं हे महान फलंदाजासाठीही अवघड असते, पण क्रिकेटबरोबरच अश्विन आता बुध्दिबळाच्या पटावरही आला आहे. अश्विन ग्लोबल चेस लीगमधील अमेरिकन गॅम्बिट्स संघाचा सहमालक झाला आहे.

ग्लोबल चेस लीगचा पहिला हंगाम २०२३ मध्ये खेळवण्यात आला होता. आता या लीगचे दुसरे वर्ष २०२४ मध्ये खेळवले जाणार आहे. दरम्यान या लीगमधील एक संघ रवीचंद्रन अश्विनने विकत घेतला आहे. ग्लोबल चेस लीगच्या दुसऱ्या सत्रात सहभागी होणारा सर्वात नवीन संघ अमेरिकन गॅम्बिट्स असणार आहे. ग्लोबल चेस लीग ही स्पर्धा टेक महिंद्रा आणि आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ यांच्या संयुक्त मालकीची लीग आहे. प्रसिद्ध उद्योगपती प्रचूर पीपी, व्यंकट के नारायण आणि अश्विन यांच्या मालकीचे अमेरिकन गॅम्बिट्स या स्पर्धेत चिंगारी गल्फ टायटन्सची जागा घेतील. लीगचा दुसरा हंगाम ३ ते १२ ऑक्टोबर दरम्यान लंडनमध्ये खेळवला जाईल. पाच वेळा विश्व बुद्धिबळ चॅम्पियन ठरलेल्या विश्वनाथन आनंदनेही या दिग्गज क्रिकेटपटूचे बुद्धिबळाच्या जगात स्वागत केले.

logo
marathi.freepressjournal.in