रविंद्र जडेजाचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "मी कर्णधार नाही मात्र..."

भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने इडन गार्डनवर दमदार कामगिरी केली
 रविंद्र जडेजाचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "मी कर्णधार नाही मात्र..."
Published on

भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने इडन गार्डनवर दमदार कामगिरी केली. त्याने दक्षिण अफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात 33 धावात पाच विकेट्स घेत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. भारताने प्रथम फलंदाजी करत 327 धावा केल्या होत्या. त्यानंतर दक्षिण अफ्रिकेचा 83 धावात खुर्दा उडवला. भारताने सामना 243 धावांनी जिंकत गुणतालिकेतील आपले प्रथम स्थान पक्के केले होते.

दरम्यान, सामन्यानंतर रविंद्र जडेजाने एक अप्रतिम प्रतिक्रिया दिली. रवींद्र जडेजा म्हणला, 'पहिल्या दिवसापासूनच मी कर्णधारासारखा विचार करत आहे. मात्र मी कर्णधार नाही ही दुसरी गोष्ट. मी एक अष्टपैलू खेळाडू म्हणून 30 - 35 धावा करणे आणि भागीदारी तोडणे ही माझी जबाबदारी आहे. मी कायम प्रभावी कामगिरी करण्याचा प्रयत्न करतो.' तो पुढे म्हणाला की, 'मी फिल्डिंग करताना सर्व गोष्टी गृहीत धरत नाही. मी झेल देखील सोडू शकतो. त्यामुळे मी कायम सतर्क राहण्याचा प्रयत्न करत असतो. मी जरी झेल घेतला तरी मी निवांत होत नाही. मी कायम प्रयत्नशील राहतो. मी कधी यशस्वी होईन कधी नाही. पण मी कायम प्रयत्न करत राहतो.

रविंद्र जडेजा म्हणाला, 'मागील काही सामन्यात माझा रिदम चांगला आहे. मी खूप आनंदी आहे. की मी आपल्या संघासाठी आपले योगदान देऊ शकलो. मी फलंदाजी आणि गोलंदाजीत चांगली कामगिरी करत आहे. येणाऱ्या सामन्यात देखील मी चांगली कामगिरी करणार असा विश्वास मला आहे.असं रवींद्र जडेजाने म्हटलं आहे.

logo
marathi.freepressjournal.in