हरमन VS स्मृती; अंतिम फेरीसाठी मुंबई-बंगळुरू यांच्यात द्वंद्व!

हरमन VS स्मृती; अंतिम फेरीसाठी मुंबई-बंगळुरू यांच्यात द्वंद्व!

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणारा मुंबई इंडियन्स आणि स्मृती मानधनाचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन संघांत...

नवी दिल्ली : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणारा मुंबई इंडियन्स आणि स्मृती मानधनाचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन संघांत शुक्रवारी महिलांच्या प्रीमियर लीगमध्ये (डब्ल्यूपीएल) एलिमिनेटरचा सामना रंगेल. या लढतीतील विजेता रविवारी दिल्ली कॅपिटल्सशी अंतिम सामन्यात दोन हात करेल.

गतविजेत्या मुंबईने साखळीत ८ पैकी ५ सामने जिंकून १० गुणांसह दुसरे स्थान मिळवले. गतवर्षीसुद्धा मुंबईने दुसरे स्थानच पटकावून मग त्यानंतर पुढे जाऊन स्पर्धा जिंकली. मुंबईला अखेरच्या साखळी सामन्यात बंगळुरूकडूनच दारुण पराभव पत्करावा लागला. त्यामुळे ते त्या पराभवाचा वचपा घेण्यास आतुर असतील. हायली मॅथ्यूज, नॅट शीव्हर-ब्रंट, अमेलिया कर यांच्यावर मुंबईची भिस्त असून हरमनप्रीतही उत्तम लयीत आहे.

दुसरीकडे बंगळुरूची मदार प्रामुख्याने एलिस पेरीच्या अष्टपैलू कामगिरीवर आहे. तिला रिचा घोष, स्मृती, सोफी डिवाईन यांची फलंदाजीत उत्तम साथ अपेक्षित आहे. गोलंदाजीत रेणुका सिंग व जॉर्जिया वेरहॅम यांच्यावर बंगळुरूची भिस्त आहे. बंगळुरूने ८ पैकी ४ सामने जिंकून ८ गुणांसह साखळीत तिसरे स्थान मिळवले. गतवर्षी बंगळुरूला बाद फेरी गाठण्यात अपयश आले होते.

वेळ : सायंकाळी ७.३० वाजता

थेट प्रक्षेपण : स्पोर्ट्स १८ वाहिनी

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in