नवी मुंबई प्रीमियर क्रिकेट लीगसाठी नोंदणीला प्रारंभ

मुंबई क्रिकेट संघटनेची मान्यता असलेल्या या लिगकरता फक्त ठाणे जिल्ह्यातील क्रिकेटपटूंना निवड चाचणी प्रक्रियेत सहभागी होता येईल
नवी मुंबई प्रीमियर क्रिकेट लीगसाठी नोंदणीला प्रारंभ
PM

ठाणे : माझगाव क्रिकेट क्लब आयोजित दुसऱ्या नवी मुंबई प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेकरता खेळाडू नोंदणीस सुरुवात झाली आहे. मुंबई क्रिकेट संघटनेची मान्यता असलेल्या या लिगकरता फक्त ठाणे जिल्ह्यातील क्रिकेटपटूंना निवड चाचणी प्रक्रियेत सहभागी होता येईल. ठाणे जिल्ह्यातील क्रिकेटपटूंना संधी देण्याच्या उद्देशाने खेळवण्यात येणाऱ्या  या लीगमध्ये आठ संघ विजेतेपदासाठी लढत देतील. या आठ संघाकरता या निवड चाचणी नंतर लिलावाद्वारे खेळाडूंना निवडण्यात येणार आहे. फेब्रुवारी महिन्यात रंगणाऱ्या या लीगमध्ये अंबरनाथ ऍव्हेंजर्स, वाशी वारियर्स, कोपरखैरणे टायटन्स, मिरा-भाईंदर लायन्स, बेलापूर ब्लास्टर्स, ठाणे टायगर्स, सानपाडा स्कॉर्पिअन, कल्याण टस्कर आदी संघाचा समावेश असून स्पर्धेदरम्यान विजयी संघासह लीगमधील प्रत्येक संघाला रोख बक्षिसे देण्यात येतात. अधिक माहितीसाठी ९८६७६९८१२२ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in