फजल, तिवारी यांची क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्ती

मुंबईने त्याला हंगाम संपेपर्यंत थांबण्याची विनंती केली आहे. सौरभने झारखंडचे अखेरच्या साखळी सामन्यात यशस्वी नेतृत्व करताना राजस्थानला नमवले.
फजल, तिवारी यांची क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्ती

विदर्भाचा अनुभवी सलामीवीर फैझ फझल, बंगालचा कर्णधार मनोज तिवारी, मुंबईचा मध्यमगती गोलंदाज धवल कुलकर्णी यांनी या रणजी हंगामातील अखेरच्या साखळी सामन्याद्वारे क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली. त्याशिवाय झारखंडच्या सौरभ तिवारीनेसुद्धा काही दिवसांपूर्वी निवृत्ती जाहीर केली होती. आयपीएल तसेच भारतीय संघात संधी मिळण्याची शक्यता फारच धूसर असल्याने तसेच युवा खेळाडूंना संधी देण्याच्या कारणाने या खेळाडूंनी निवृत्तीचा निर्णय घेतला आहे, हे स्पष्ट आहे. मनोजच्या बंगालने अखेरच्या सामन्यात बिहारला डावाने धूळ चारली. मात्र तरीही ते ब-गटातून आगेकूच करू शकले नाहीत. फैझच्या विदर्भ संघाने मात्र उपांत्यपूर्व फेरी गाठली असली, तरी तो त्या सामन्यात खेळणार नाही. तसेच धवलचा समावेश असलेल्या मुंबई संघानेही आगेकूच केली आहे. मुंबईने त्याला हंगाम संपेपर्यंत थांबण्याची विनंती केली आहे. सौरभने झारखंडचे अखेरच्या साखळी सामन्यात यशस्वी नेतृत्व करताना राजस्थानला नमवले.

logo
marathi.freepressjournal.in