वेस्ट इंडिजच्या 'या' अष्टपैलू महिला खेळाडूची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

डॉटिन पोस्टमध्ये लिहिले की, 'माझ्या क्रिकेट कारकीर्दीत अनेक अडथळे आले; पण मी त्यावर मात केली
वेस्ट इंडिजच्या 'या' अष्टपैलू महिला खेळाडूची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

वेस्ट इंडिजची अष्टपैलू खेळाडू डिएंड्रा डॉटिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. ३१ वर्षीय डॉटिनने ट्विटरवर एक इमोशनल पोस्ट शेअर करत निवृत्तीची घोषणा केली. डॉटिनला महिला ख्रिस गेल देखील म्हटले जाते.

डॉटिन पोस्टमध्ये लिहिले की, 'माझ्या क्रिकेट कारकीर्दीत अनेक अडथळे आले; पण मी त्यावर मात केली. मी खेळाची आवड जोपासू शकण्याजोगे सध्याचे सांघिक वातावरण दिसत नाही. मी दु:खी असले, तरी या संघाच्या तत्त्वांशी आणि वातावरणाशी जुळवून घेण्यास मी सक्षम आहे. मला आतापर्यंत मिळालेल्या संधीबद्दल मी कृतज्ञ आहे. हा निर्णय मी अत्यंत विचारपूर्वक घेतला आहे. मी गेल्या १४ वर्षांत कठोर परिश्रम घेतले आणि मला शारीरिक, मानसिक आणि भावनिकदृष्ट्या मजबूत बनविले.

डॉटिन सध्या बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत बार्बाडोस संघाचा भाग आहे. हा संघ बुधवारी भारताविरुद्ध शेवटचा साखळी सामना खेळणार आहे. या सामन्यातील विजयी संघ उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित करणार आहे. महिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत शतक ठोकण्याचा विक्रम तिने केला आहे. डॉटिनने २०१०च्या टी-२० वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अवघ्या ३८ चेंडूंत शतक झळकाविले होते.

डॉटिनने जून २००८मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. विंडीज संघासाठी १२६ टी-२० आणि १४३ वन-डे सामने खेळले. एकदिवसीय सामन्यांमध्ये तिने ३०.५४ च्या सरासरीने तीन हजार ७२७ धावा केल्या. यात तीन शतके आणि २२ अर्धशतकांचा समावेश आहे. डॉटिनने टी-२०मध्ये २५.९३च्या सरासरीने दोन हजार ६९७ धावा केल्या आहेत. डॉटिनने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये दोन शतके आणि १२ अर्धशतके झळकाविली आहेत. डॉटिनने वन-डे सामन्यांमध्ये ७२ विकेट्स घेतले आहेत; तर टी-२० सामन्यांमध्ये ६२ विकेट्स घेतल्या आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in