रिले रुसोचे दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० संघात पुनरागमन, मात्र 'या' खेळाडूला संघातून वगळले

हाच संघ या महिन्याच्या अखेरीस तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी भारताचा दौरा करणार आहे
 रिले रुसोचे दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० संघात पुनरागमन, मात्र 'या' खेळाडूला संघातून वगळले

क्रिकेट दक्षिण आफ्रिकाने येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपसाठी आपला संघ जाहीर केला आहे. स्टार फलंदाज रासी व्हॅन डर डुसेनला १५ जणांच्या संघातून वगळण्यात आले आहे. संघाचे कर्णधारपद टेंबा बावुमाकडे सोपविण्यात आले आहे. हाच संघ या महिन्याच्या अखेरीस तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी भारताचा दौरा करणार आहे.

कर्णधार टेम्बा बावुमा जूनमध्ये दुखापतीतून पूर्णपणे बरा झाला आहे. सलग दुसऱ्या विश्वचषकासाठी तो दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे नेतृत्व करणार आहे. त्याचबरोबर रिले रुसोनेही दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० संघात पुनरागमन केले आहे.

दक्षिण आफ्रिकेचा संघ – टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डिकॉक, हेनरिक क्लासेन, रीजा हेंड्रिक्स, केशव महाराज, एडेन मार्करम, डेविड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्टजे, वेन पार्नेल, ड्वेन प्रिटोरियस, कैगिसो रबाडा, रिले रोसौव, तबरेज शम्सी.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in