रिंकू सिंह - प्रिया सरोज विवाहबंधनात अडकणार; ८ जूनला साखरपुडा, १८ नोव्हेंबरला विवाह

भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंह विवाहबंधनात अडकणार आहे. समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज यांच्याशी त्याचा साखरपुडा ८ जून रोजी लखनऊ येथे होणार आहे. प्रिया सरोज यांचे वडील तुफानी सरोज यांनी ही माहिती दिली.
रिंकू सिंह - प्रिया सरोज विवाहबंधनात अडकणार; ८ जूनला साखरपुडा, १८ नोव्हेंबरला विवाह
Published on

जौनपूर : भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंह विवाहबंधनात अडकणार आहे. समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज यांच्याशी त्याचा साखरपुडा ८ जून रोजी लखनऊ येथे होणार आहे. प्रिया सरोज यांचे वडील तुफानी सरोज यांनी ही माहिती दिली.

१८ नोव्हेंबरला हे जोडपे विवाहबंधनात अडकणार आहे. वाराणसी येथील हॉटेल ताज येथे हा विवाहसोहळा पार पडणार आहे. जागतिक क्रिकेटमधील नामवंत व्यक्ती, बॉलिवूडमधील कलाकार, व्यावसायिक आणि राजकारणी व्यक्ती यांना या सोहळ्याचे आमंत्रण दिले जाणार आहे.

२७ वर्षीय रिंकूने अलिकडच्या काही वर्षांत २ एकदिवसीय आणि ३३ टी-२० सामन्यांत भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्सचा तो नामवंत खेळाडू आहे. २६ वर्षीय प्रिया ही जौनपूरमधील मछलीशहर मतदारसंघातून पहिल्यांदाच खासदार झाली आहे.

तुफानी यांनी सांगितले की, जवळचे नातेवाईक, मित्रपरिवार अशा मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा साखरपुडा होणार आहे. अलिगड येथे दोन्ही कुटुंबात भेट झाल्यानंतर हे लग्न ठरले आहे.

रिंकू सिंह हा कोलकाता नाईट रायडर्स संघाचा युवा फलंदाज आहे. आयपीएलमध्ये त्याने आपल्या फलंदाजीने छाप सोडली आहे.

अशी झाली दोघांची ओळख

गेल्या काही काळापासून रिंकू आणि प्रिया हे दोघे एकमेकांना ओळखत आहेत. प्रियाच्या वडिलांच्या मित्राच्या माध्यमातून या दोघांची भेट झाली होती. दोन्ही कुटुंबाच्या संमतीने लग्न जमल्याचे तुफानी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in