ऋतुराज गायकवाड अडकणार लग्नबंधनात; जूनमध्ये करणार लग्न

ऋतुराज हा 3 आणि 4 जूनदरम्यान लग्न करणार असल्याचे सांगितले जात आहे
ऋतुराज गायकवाड अडकणार लग्नबंधनात; जूनमध्ये करणार लग्न

आज आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचा शेवटचा सामन्याचा थरार चेन्नई आणि गुजरात या संघामध्ये अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगणार आहे. या सामान्याआधीच ऋतुराज गायकवाड ने आपल्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. ऋतुराज गायकवाड लवकरच लग्नगाठ बांधणार असल्याची चर्चा आहे. उत्कर्षा पवारसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले जात आहे.

ऋतूराज गायकवाड लग्न करणार असल्याने त्याने आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधून माघार घेतली असल्याचे देखील वृत्त समोर आले आहे. मिळालेल्या माहिती नुसार ऋतुराज हा 3 आणि 4 जूनदरम्यान लग्न करणार असल्याचे वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.

लग्नामुळे ऋतुराज गायकवाडने माघार घेतल्याने त्याच्या जागी यशस्वी जायस्वाल याला आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी भारतीय संघात सामाविष्ट करण्यात आले आहे.

उत्कर्षा पवार आणि ऋतुराज गायकवाड दोघेही खुप दिवसांपासून एकमेकांना ओळखत असून बऱ्याच दिवसांपासून ते रिलेशनशिपमध्ये आहेत. मागील वर्षी एका जिम सेशनमध्ये उत्कर्षा आणि ऋतुराज सोबत दिसले होते. दोघांनी ही आपल्या नात्याबद्दल एक शब्द काढला नव्हता. त्यांनी आपले नाते गुपीत ठेवले होते. सोशल मीडियावर देखील त्यांनी आपले फोटो शेअर केले नव्हते. दोघांच्या नात्याबद्दल कोणालाही जास्त कल्पना नव्हती. आता जून महिन्यात दोघेही लग्न करणार आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in