

लाहोर : पाकिस्तान क्रिकेट बोर्डनि (पीसीबी) शनिवारी जाहीर केलेल्या नव्या केंद्रीय करारांच्या यादीतून माजी कर्णधार मोहम्मद रिझवान, शान मसूद आणि सलामीवीर इमाम उल हक यांना डच्चू दिला आहे. मागील केंद्रीय करारांची मुदत ३० जून रोजी संपल्यानंतर दीर्घ विलंबाने हे करार जाहीर करण्यात आले आहेत.
नव्या स्वरूपातील करार प्रणालीमध्ये कसोटी कर्णधार बाबर आझम आणि सलमान अली आघा यांना कसोटी व एकदिवसीय क्रिकेटच्या श्रेणीत स्थान देण्यात आले आहे. एकदिवसीय संघाचा कर्णधार शाहीन आफ्रिदी याला एकदिवसीय आणि टी-२० श्रेणीत करार देण्यात आला आहे. पाकिस्तान च्या अलीकडील टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांचे नेतृत्व करणाऱ्या साहिबजादा फरहानला केवळ टी-२० श्रेणीत करार मिळाला आहे. एकूण ३८ खेळाडूंना करार देण्यात आले आहेत.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे केंद्रीय करार
कसोटी आणि वनडे श्रेणी : बाबर आझम, सलमान अली आघा
कसोटी श्रेणी: अझान अवैस, साजिद खान, मोहम्मद अब्बास, सौद शकील
एकदिवसीय/टी-२० श्रेणी: शाहीन शाह आफ्रिदी, अबरार अहमद, अराफात मिन्हास, फखर जमान, फहीम अश्रफ, हारिस रौफ
टी-२० श्रेणी: हसन नवाज, नसीम शाह, माज सदाकत, मोहम्मद सलमान मिर्झा, साहिबजादा फरहान, शादाब खान, उस्मान तारिक
विकास श्रेणी : अब्दुल समद, अली रझा, मोहम्मद ताहा, साद मसूद, इमरान रंधावा, शहजैब खान, उबैद शाह, अब्दुल्ला फजल, फरहान युसूफ, तैयब आरिफ, रझाउल्ला, समीर मिन्हास, शमील हुसेन, अहमद दानियाल, हुनैन शाह, गाझी घोरी, साकिब खान, सुफियान मोकीम आणि साद बैग.