36th BCCI President : रॉजर बिन्नी यांची भारतीय नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत रॉजर बिन्नी यांनी बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याकडून पदभार स्वीकारला
36th BCCI President :  रॉजर बिन्नी यांची भारतीय नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

भारताच्या 1983 च्या विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य आणि माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी यांची भारतीय नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर, राजीव शुक्ला हे बीसीआयचे अध्यक्ष आहेत. बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत रॉजर बिन्नी यांनी बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याकडून पदभार स्वीकारला. रॉजर बिन्नी बीसीसीआयचे ३६ वे अध्यक्ष बनले आहेत. रॉजर बिन्नी यांच्याकडे बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाणार हे जवळपास निश्चित झाले होते. 

अष्टपैलू खेळाडू रॉजर बिन्नीने 1979 ते 1987 पर्यंत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. रॉजर बिन्नीने 27 कसोटी सामन्यात 830 धावा केल्या आहेत. 72 एकदिवसीय सामन्यांमध्ये 629 धावा केल्या आहेत. त्यांनी कसोटीत पाच अर्धशतके आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये एक अर्धशतक झळकावले आहे. रॉजर बिन्नीने कसोटीत 11 आणि एकदिवसीय सामन्यात 12 झेल घेतले आहेत. रॉजर बिन्नीने 27 कसोटीत 47 बळी घेतले आहेत, तसेच 72 वनडेत 77 विकेट घेतल्या आहेत. रॉजर बिन्नी १९८३ च्या विश्वचषक विजेत्या संघाचा प्रमुख भाग होते. या विश्वचषकात रॉजर बिन्नीने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. 

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in