‘टेनिस हॉल ऑफ फेम’मध्ये रॉजर फेडरर

टेनिस जगतातील दिग्गज खेळाडू रॉजर फेडररचा शनिवारी आंतरराष्ट्रीय टेनिस ‘हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश करण्यात आला.
‘टेनिस हॉल ऑफ फेम’मध्ये रॉजर फेडरर
‘टेनिस हॉल ऑफ फेम’मध्ये रॉजर फेडरर(Photo-X)
Published on

न्यूपोर्ट, अमेरिका : टेनिस जगतातील दिग्गज खेळाडू रॉजर फेडररचा शनिवारी आंतरराष्ट्रीय टेनिस ‘हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश करण्यात आला. न्यूपोर्ट येथील गवत कोर्टवर आयोजित या विशेष सोहळ्यात भाषण करताना ४५ वर्षीय फेडररला अनेकदा अश्रू अनावर झाले.

कारकीर्दीत २० ग्रँडस्लॅम एकेरीची विजेतेपदे पटकावणारा पहिला पुरुष खेळाडू ठरलेल्या फेडररची ओळख ‘स्विझ मेस्ट्रो’ म्हणून करून देण्यात आली. फेडररची पत्नी मिर्काने व्यासपीठावर त्याची परिचय करून दिल्यानंतर फेडररने तिची भेट घेतली आणि भाषणाला सुरुवात केली. सुमारे ३० मिनिटांच्या या भाषणात त्याने लहानपणीचा आदर्श स्टीफन एडबर्ग, प्रदीर्घ काळ राहिलेले प्रशिक्षक सेव्हेरीन लुथी आणि पत्नी मिर्का यांचे आभार मानताना भावनांवर नियंत्रण ठेवणे कठीण झाल्याचे सांगितले.

या सोहळ्यात फेडररसोबतच माजी खेळाडू आणि प्रख्यात ब्रॉडकास्टर मॅरी कॅरिलो यांचाही ‘हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश करण्यात आला.

आपल्या कारकीर्दीत सलग २३७ आठवडे जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी राहण्याचा विक्रम करणाऱ्या फेडररने ८ विम्बल्डन, ६ ऑस्ट्रेलियन ओपन, १ फ्रेंच ओपन आणि २००४ ते २००८ दरम्यान सलग ५ यूएस ओपन अशी एकूण २० ग्रँडस्लॅम विजेतेपदे जिंकली आहेत. क्रीडा इतिहासाचा भाग बनल्याचा आणि येथे उपस्थित राहिल्याचा अत्यंत आनंद असल्याचे सांगत त्याने बॉल बॉयजचे आभार मानले आणि नवीन खेळाडूंना टेनिसला नव्या उंचीवर नेण्याचे आवाहन केले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in