"हार्दिक पांड्याचं स्वप्न स्वप्नच राहिलं", रोहित-विराटच्या T20 मधील पुनरागमनाने सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव!

हार्दिक पांड्या, विराट कोहली, रोहित शर्मा यांच्यावरील मीम्स व्हायरल
"हार्दिक पांड्याचं स्वप्न स्वप्नच राहिलं", रोहित-विराटच्या T20 मधील पुनरागमनाने सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव!

गेल्या काही दिवसांपासून रोहित शर्मा आणि विराट कोहली T20 मधून निवृत्त होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. पण, या चर्चांना आता पूर्ण-विराम लागला. आगमीा अफगाणिस्तानविरूद्ध होणाऱ्या T20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा कालच झाली. यात रोहीत आणि कोहलीच्या चाहत्यांसाठी सुखद बाब म्हणजे दोन्ही खेळाडूंचे T20 संघात पुनरागमन झाले.

रोहीत शर्माच्या चाहत्यांसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे या T20 मालिकेत रोहित शर्माच कर्णधार असेल. त्यामुळे रोहितचे चाहते खूप खुश आहेत. सोशल मीडियावरही शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय. सोशल मीडियावर मिम्सचाही पाऊस सुरू झाला आहे..."हार्दिक पांड्याचं स्वप्न स्वप्नच राहिल्याचे मीम तुफान व्हायरल होतेय. हार्दिक पांड्या, विराट कोहली, रोहित शर्मा यांच्यावरील मीम्स पाहून तुम्हीही हसून- हसून लोटपोट व्हाल...

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in