रोहित शर्माचं गुरुसाठी भावनिक पत्र, राहुल द्रविड यांना म्हणाला...

राहुल द्रविड यांच्यासाठी रोहित शर्मा याने पत्र लिहित कृतज्ञता व्यक्त केली आहे.
रोहित शर्माचं गुरुसाठी भावनिक पत्र, राहुल द्रविड यांना म्हणाला...

मुंबई: नुकत्याच झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील टीम इंडियानं जेतेपदावर नाव कोरलं. या विश्वचषकामध्ये कर्णधार रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, अक्सर पटेल, अर्शदिप सिंह, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, कुलदिप यादव यांसह संघातील प्रत्येक खेळाडूचं योगदान महत्त्वाचं ठरलं. पण त्याचप्रमाणे या संघासोबत असलेल्या सपोर्ट स्टाफनंही महत्त्वाची भूमिका बजावली. खासकरून संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी संघासाठी घेतलेली मेहनत महत्त्वाची ठरली. राहुल द्रविड यांनी ज्याप्रकारे संघबांधणी केली. संघातील खेळाडूंवर विश्वास टाकला, त्याचाच परिणाम म्हणून भारतीय संघानं विश्वविजेतपदावर नाव कोरलं. २०२३ साली झालेला एकदिवसीय विश्वचषकात अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवानंतरच राहुल द्रविड प्रशिक्षकपदाचा राजीनामा देणार होते. परंतु रोहित शर्मासह संघातील प्रमुख खेळाडूंनी केलेल्या विनंतीचा मान ठेवून त्यांनी टी२० विश्वचषकापर्यंत संघासोबत राहण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियानं वर्ल्डकप ट्रॉफी जिंकत राहुल द्रविड यांना अनोखी गुरुदक्षिणा दिली. दरम्यान राहुल द्रविड यांच्यासाठी रोहित शर्मा याने पत्र लिहित कृतज्ञता व्यक्त केली आहे.

काय म्हणाला रोहित शर्मा?

प्रिय राहुल भाई,

या क्षणी माझ्या भावना योग्यरित्या व्यक्त करण्यासाठी मी शब्द शोधत आहे, पण मला हे जमेल का नाही माहिती नाही, त्यामुळे हा प्रयत्न करत आहे.

लहानपणापासून मी कोट्यवधी लोकांप्रमाणेच तुमच्याकडे पाहत आलो आहे, पण तुमच्यासोबत जवळून काम करायला मिळाल्याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजतो. तुम्ही या खेळाचे दिग्गज आहात, पण तुम्ही प्रशिक्षक म्हणून आलात तेव्हा तुम्ही तुमचं यश दाराबाहेर ठेवून आलात. तुम्ही आमच्यातलेच होऊन गेल्यामुळे आम्हाला तुमच्यासोबत कोणत्याही गोष्टी बोलताना कोणतंही दडपण जाणवलं नाही. हीच तुमची देणगी, नम्रता आणि खेळावरील प्रेम आहे. मी तुमच्याकडून खूप काही शिकलो आहे, यातला प्रत्येक क्षण कायमच आठवणीत राहिल.

माझी बायको तुम्हाला माझी कामावरची पत्नी म्हणून संबोधते. तुम्हाला तिने हे बोलणंही मी माझं भाग्य समजतो. तुमच्या उपलब्धींमध्ये फक्त हीच गोष्ट नव्हती, आपण दोघांनी ही गोष्ट मिळवली त्याबद्दल मला खूप आनंद आहे. राहुल भाई तुम्हाला माझा विश्वासू, माझा प्रशिक्षक आणि माझा मित्र म्हणायला मिळणं, हे मी माझं भाग्य समजतो.

logo
marathi.freepressjournal.in