रोहित शर्माला पुत्ररत्न! रितीकाने दिला मुलाला जन्म; सूर्यकुमारने केले अभिनंदन

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला पुत्ररत्नाचा लाभ झाला. रोहितची पत्नी रितीका सचदेहने शुक्रवारी रात्री मुंबईतील स्थानिक रुग्णालयात गोंडस मुलाला जन्म दिला.
रोहित शर्माला पुत्ररत्न! रितीकाने दिला मुलाला जन्म; सूर्यकुमारने केले अभिनंदन
Published on

मुंबई : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला पुत्ररत्नाचा लाभ झाला. रोहितची पत्नी रितीका सचदेहने शुक्रवारी रात्री मुंबईतील स्थानिक रुग्णालयात गोंडस मुलाला जन्म दिला.

बॉर्डर - गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियात दाखल झाला आहे. संघाचा कर्णधार रोहित शर्मा अद्याप मायदेशातच आहे. शुक्रवारी रात्री रोहितच्या पत्नीने बाळाला जन्म दिला. रोहित बाबा झाला आहे. या जोडप्याला आधीच समायरा नावाची मुलगी आहे. तिचा जन्म २०१८ मध्ये झाला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या सामन्याला आठवड्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. या पहिल्या सामन्यात रोहित खेळणार की नाही? याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. पहिल्या सामन्यात रोहितच्या सहभागाबाबत संभ्रम आहे. परंतु कर्णधार रोहित शर्मा पहिल्या सामन्यात संघात असेल अशी आशा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना आहे.

सूर्यकुमारने केले अभिनंदन

भारताचा टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादवने रोहितचे अभिनंदन केले. शुक्रवारी जोहान्सबर्ग येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताच्या टी-२० मालिकेतील विजयानंतर सूर्यकुमार म्हणाला की, रोहित शर्मा आणि त्याच्या कुटुंबाचे अभिनंदन. एका चांगल्या दिवशी ही गोड बातमी मिळाली आहे.

logo
marathi.freepressjournal.in