Video: सिली पॉईंटला हेल्मेट घातलं नाही; रोहित शर्मा सर्फराजला म्हणाला, "हे भावा हिरो नाही व्हायचं..."

कर्णधार रोहित शर्माने नुकतच भारतीय क्रिकेट संघात पदार्पण केलेल्या सर्फराज खानची मैदानातच शाळा घेतली आहे.
Rohit Sharma And Sarfaraz Khan
Rohit Sharma And Sarfaraz Khan

भारत आणि इंग्लंड यांच्यात रांचीत तिसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात फिरकी गोलंदाजांचा दबदबा सुरु असतानाच दुसरीकडे मजेशीर व्हिडीओ समोर येत आहेत. कर्णधार रोहित शर्माने नुकतच भारतीय क्रिकेट संघात पदार्पण केलेल्या सर्फराज खानची मैदानातच शाळा घेतली आहे.

कारण सिली पॉईंटला क्षेत्ररक्षणसाठी गेलेल्या सर्फराजने हेल्मेट घातलं नव्हतं. त्यावेळी रोहितने त्याला आवाज देत स्वत:ची काळजी घेण्यासाठी सांगितलं. भावा हिरो व्हायचं नाही. हेल्मेट घाल, असं रोहित शर्मा सर्फराजला म्हणाला. रोहितचा आवाज स्टंप माईकमध्ये कैद झाला असून व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

इथे पाहा रोहित शर्मा आणि सर्फराज खानचा व्हिडीओ

रविचंद्रन आश्विनची गोलंदाजी सुरु असताना इंग्लंडचा फलंदाज शोएब बाशिर त्याचा सामना करत होता. त्यावेळी रोहितने सर्फराजला त्याच्या जवळ सिली पॉईंटला क्षेत्ररक्षण करण्यास सांगितलं. पण सर्फराजने हेल्मेट न घालताच क्षेत्ररक्षण करण्यासाठी गेला. त्यानंतर रोहितने त्याला हेल्मेट घालण्यासाठी सांगितलं.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in