रोहित शर्माच्या षटकाराने चिमुकली झाली जखमी

षटकाच्या पहिल्या आणि दुसऱ्या चेंडूवर एकही धाव झाली नाही. त्याचवेळी तिसरा चेंडू शॉर्ट पिच होता.
रोहित शर्माच्या षटकाराने चिमुकली झाली जखमी

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय डावादरम्यान टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने लगावलेल्या एका षटकाराने मीरा साळवी ही सहा वर्षांची मुलगी जखमी झाली. सामना जिंकल्यानंतर रोहितने मीराची भेट घेऊन तिची प्रकृती जाणून घेतली. एवढेच नाही तर भारतीय कर्णधाराने तिला एक टेडी बेअर आणि काही चॉकलेट्स भेट दिली. भारताच्या डावाच्या पाचव्या षटकात रोहित स्ट्राइकवर होता. इंग्लंडकडून डेव्हिड विली गोलंदाजी करत होता.

षटकाच्या पहिल्या आणि दुसऱ्या चेंडूवर एकही धाव झाली नाही. त्याचवेळी तिसरा चेंडू शॉर्ट पिच होता. रोहितने स्क्वेअर लेग बाऊंड्रीकडे तो भिरकावला. स्टँडमध्ये बसलेल्या मीरा साळवीला चेंडू लागला. सुदैवाने तिला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. मुलीला झालेल्या दुखापतीमुळे रोहित उदास दिसत होता. व्यवस्थापनाने स्टँडमध्ये तातडीने वैद्यकीय पथक पाठविले. मुलगी सुखरूप असल्याची आणि तिला गंभीर इजा झाली नसल्याची बातमी कळल्यानंतर पुन्हा खेळ सुरू झाला.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in