रोहित,विराट,मिताली यांच्या क्लबमध्ये या महिला खेळाडूचाही समावेश

भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर स्मृती मानधनाने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन हजार धावा पूर्ण केल्या
रोहित,विराट,मिताली यांच्या क्लबमध्ये या महिला  खेळाडूचाही समावेश

भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर स्मृती मानधनाने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन हजार धावा पूर्ण केल्या. ती भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, माजी कर्णधार विराट कोहली, माजी महिला कर्णधार मिताली राज आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांच्या क्लबमध्ये समाविष्ट झाली.

रोहित आणि विराट यांनी प्रत्येकी तीन हजारांहून अधिक धावा केल्या आहेत, तर क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये दोन हजारहून अधिक धावा पूर्ण करणाऱ्यांमध्ये मिताली राज आणि हरमनप्रीत कौर यांचा समावेश आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात स्मृती मंधानाने ११ धावा करताच तिच्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन हजार धावा पूर्ण झाल्या. या सामन्यात ती केवळ २२ धावाच करू शकली असली, तरी एक मोठी कामगिरी तिने आपल्या नावावर केली. स्मृती मानधनाने ८६ सामन्यांत १४ अर्धशतकांसह दोन हजार धावा पूर्ण केल्या आहेत.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in