रोहितची मुलगी समायराने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करत ऋषभला खास शुभेच्छा दिल्या

फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करताना लाज वाटत नाही का? त्या व्यक्तीचे मित्र आणि कुटुंबीय फोटो आणि व्हिडिओ पाहून
रोहितची मुलगी समायराने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करत ऋषभला खास शुभेच्छा दिल्या

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा सुट्टीसाठी मालदीवमध्ये असून तिथून तो डॉक्टरांच्या सतत संपर्कात आहे. रोहितची मुलगी समायराने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करत ऋषभला खास शुभेच्छा दिल्या आहेत. तिने म्हटले आहे की, “चाचू जल्दी ठीक हो जाओ” दरम्यान, रोहितने ऋषभवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या टीमशी संवाद साधला. तो आपल्या जोडीदाराच्या तब्येतीबद्दल खूप काळजीत दिसत होता. रुग्णालय व्यवस्थापन थेट कुटुंबीयांशी आणि बीसीसीआयला उपचाराबाबत माहिती देत ​​आहे.

रोहितची पत्नी रितिकाने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करताना ऋषभच्या अपघाताचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. तिने लिहिले की, ‘फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करताना लाज वाटत नाही का? त्या व्यक्तीचे मित्र आणि कुटुंबीय फोटो आणि व्हिडिओ पाहून दु;खी होऊ शकतात.’’

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in