रोनाल्डोचे क्लब फुटबॉलमध्ये सातशे गोल

रोनाल्डोने आपल्या कारकिर्दीत रियल मॅड्रिडसाठी ४५० गोल केले
रोनाल्डोचे क्लब फुटबॉलमध्ये सातशे गोल

मँचेस्टर युनायटेडचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने प्रीमियर लीगच्या एका सामन्यात एव्हर्टनविरुद्ध आपला ७०० वा क्लब गोल गोल करत विक्रम रचला. हा विक्रम आपल्या नावे करणारा रोनाल्डो एकमेव खेळाडू ठरला.

३७ वर्षीय पोर्तुगीज खेळाडू रोनाल्डो क्लब फुटबॉलमध्ये सातशे गोल करणारा जगातील पहिला आणि एकमेव फुटबॉलपटू ठरला. रोनाल्डोने ९४४ सामन्यांमधून ही कामगिरी केली.

रोनाल्डोने आपल्या कारकिर्दीत रियल मॅड्रिडसाठी ४५० गोल केले. याशिवाय त्याने मँचेस्टर युनायटेडसाठी १४४, जुव्हेंटससाठी १०१ आणि स्पोर्टिंगसाठी ५ गोल केले. रोनाल्डोचे १२९ गोल पेनल्टी शॉट्समधून झाले. त्याने एकूण ५० वेळा हॅट् ट्रिक केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in