झिम्बाब्वेच्या 'या' माजी कर्णधाराच्या मृत्येच्या अफवेने खळबळ ; अनेक क्रिकेटपटूंनी वाहिली श्रद्धांजली

भारतामधील अनेक माजी क्रिकेटपटू आणि सध्याच्या क्रिकेटपटूंनीही देखील त्यांना श्रद्धांजली वाहिली होती
झिम्बाब्वेच्या 'या' माजी कर्णधाराच्या मृत्येच्या अफवेने खळबळ ; अनेक क्रिकेटपटूंनी वाहिली श्रद्धांजली

झिम्बाब्वे संघाचा माजी कर्णधार हीथ स्ट्रीक याचं वयाच्या 49 व्या वर्षी कर्करोगामुळे निधन झाल्याच्या बातम्या सकाळीपासून येत असल्याची माहिती खुद्द त्याचा माजी सहकारी हेन्री ओलांगा यांनी दिली होती. यानंतर त्या बातमीने क्रीडा विश्वात चांगलीच खळबळ उडाली.

ही बातमी सर्वदूर पसरल्याने सर्वांनाच खूप मोठा धक्का बसला. त्यामुळेच भारतामधील अनेक माजी क्रिकेटपटू आणि सध्याच्या क्रिकेटपटूंनीही देखील त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पण खरं तर स्ट्रीकचा यांचा जिवंत आहे. हीथच्या मृत्यूची बातमी खुद्द हेन्री ओलांगा यांनी खोटी ठरवली. यानंतर त्यांनी त्यांची जुनी पोस्ट देखील सोशल मीडियावरून डिलीट केली.

हेन्री ओलांगा यांनी सोशल मीडियावर एका नवीन पोस्टमध्ये लिहिले आहे की, "मी पुष्टी करत आहे की हीथ स्ट्रीकच्या निधनाच्या अफवा पसरल्या जात आहे. मी नुकतंच त्याच्याकडून ऐकले. तिसऱ्या पंचाने त्याला परत ही बोलावले आहे आणि तो जिवंत आहे मित्रांनो."

दरम्यान, सुरुवातीला त्यांच्या मृत्यूच्या बातमीने सर्वत्र खळबळ उडाली होती. क्रिकेट विश्वातून अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in