ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये धावपटू फ्रेझर -प्रिसला विजेतेपद ; १० सेकंदात १०० मीटर धावली

दरम्यान, जमैकाच्या धावपटूंनी सुवर्ण, रौप्य आणि कांस्य अशी तिन्ही पदके जिंकली.
ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये धावपटू फ्रेझर -प्रिसला विजेतेपद ; १० सेकंदात १०० मीटर धावली

जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सोमवारी जमैकाची धावपटू शेली-अ‍ॅन फ्रेझर-प्रिस १०.६७ सेकंद वेळेची नोंद करत १०० मीटर शर्यतीचे विजेतेपद पटकाविले. ती स्पि्रंट शर्यतीची विश्वविजेती ठरली. रौप्य आणि कांस्यपदक अनुक्रमे शेरिका जॅक्सन (१०.७३ से.) आणि एलेन थॉमसन हेर=राह (१०.८० से.) यांनी मिळविले.

दरम्यान, जमैकाच्या धावपटूंनी सुवर्ण, रौप्य आणि कांस्य अशी तिन्ही पदके जिंकली. एक दिवस आधी पुरुष गटाच्या १०० मीटर शर्यतीतही अशा कामगिरीची नोंद झाली होती. त्यावेळी अमेरिकन धावपटूंनी सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदक जिंकले.

जागतिक चॅम्पियनशिपच्या इतिहासात १०० मीटर शर्यतीत (पुरुष आणि महिला गट) क्लीन स्वीप करण्याची ही पहिलीच वेळ ठरली. यापूर्वी १९९१ आणि १९८३ हंगामातील पुरुष गटातील धावपटूंनी क्लीनस्वीप केले होते. दोन्ही वेळा अमेरिकेने तिन्ही पदके जिंकली होती; पण त्या हंगामातील महिलांच्या शर्यतीची पदके वेगवेगळ्या देशांना मिळाली होती. यावेळी मात्र महिलांमध्ये पहिल्यांदाच एखाद्या देशाने क्लीन स्वीप केला आहे.

फ्रेडने जिंकले पहिले वैयक्तिक सुवर्ण

अमेरिकन अ‍ॅथलीट फ्रेड केरी जगातील सर्वात वेगवान धावणारी व्यक्ती ठरला. त्याने जागतिक अ‍ॅथलेटिक्समध्ये १०० मीटर शर्यत ९.८६ सेकंदात पूर्ण करून सुवर्णपदक जिंकले. जागतिक चॅम्पियनशिपमधील २७ वर्षीय तरुणाचे हे पहिले वैयक्तिक सुवर्णपदक आहे. त्याने प्रथमच १०० मीटर स्पर्धेत भाग घेतला होता आणि त्यात तो वर्ल्ड चॅम्पियन बनला. या स्पर्धेत अमेरिकेने क्लीन स्वीप केले आहे. मार्विन ब्रेसीने (९.८८ सेकंद) रौप्य आणि त्रावन ब्रोमेल (९.८८ सेकंद) ने कांस्यपदक जिंकले. १९९१ नंतर प्रथमच जागतिक १०० मीटर तिन्ही पदके एकाच देशाने जिंकली आहेत. यंदाच्या मोसमातील दोन्ही विजेते विश्वविक्रमाच्या जवळपास राहिले. प्रेसीचा विश्वविक्रम अवघ्या १८ मायक्रोसेकंदांनी चुकला, तर फ्रेड पुरुष गटातील विश्वविक्रमापासून ३० मायक्रोसेकंद दूर होता. महिलांच्या गटात शंभर मीटरचा जागतिक विक्रम फ्लोरेन्स ग्रिफिथ जॉयनर (१०.४९ सेकंद) यांच्या नावावर आहे. तिने १९८८ मध्ये नोंदविला होता. त्याच वेळी पुरुष गटात १०० मीटरचा जागतिक विक्रम जमैकाचा धावपटू उसेन बोल्टच्या (९.५८ सेकंद) नावावर आहे. हा विक्रम त्याने २००९ मध्ये केला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in