

जागतिक अंडर-२० ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रूपल चौधरीने दोन पदके पटकाविली. या चॅम्पियनशिपमध्ये दोन पदके जिंकणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली. रूपलने पहिल्या ४X४०० मीटर रिले शर्यतीत रौप्यपदक मिळविले. त्यानंतर तिने महिलांच्या ४०० मीटर शर्यतीत कांस्यपदक पटकाविले.
भारताचे बार्थ श्रीधर, प्रिया मोहन, कपिल आणि रूपल चौधरी यांनी तीन मिनिटे १७.७६ सेकंदात शर्यत पूर्ण करीत आशियाई ज्युनिअर विक्रम केला. या शर्यतीनंतर रूपलने ४०० मीटर शर्यतीत कांस्यपदक पटकाविले. रूपलने ५१.८५ सेकंदात शर्यत पूर्ण केली.
रूपल उत्तर प्रदेशमधील मेरठ जिल्ह्यातील आहे. तिचे वडील शेती करतात. अवघ्या १७ वर्षांच्या रूपलने आतापर्यंत अनेक स्पर्धांमध्ये कमाल कामगिरी केली. तिने ज्युनिअर लेवलवर राष्ट्रीय स्पर्धांमध्येही अप्रतिम खेळ केला. रूपलच्या वडिलांनी सांगितले की, गावातील मुली या शर्यतीत भाग घेत नाहीत; पण रूपलने २०१६मध्ये अॅथलिट व्हायचे तिने ठरविले.
गावापासून जवळचे अॅथलेटिक्स स्टेडियम मेरठमध्ये होते.