Ruturaj Gaikwad Scores Century : ऋतुराज गायकवाडच्या बॅटमधून धावांची मशीन चालूच... आसामविरुद्ध 126 चेंडूत 168 धावा केल्या

महाराष्ट्र संघाने 7 बाद 350 धावा केल्या. त्याचबरोबर आसाम संघासमोर 351 धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले
Ruturaj Gaikwad Scores Century : ऋतुराज गायकवाडच्या बॅटमधून धावांची मशीन चालूच... आसामविरुद्ध 126 चेंडूत 168 धावा केल्या

विजय हजारे ट्रॉफी 2022 चा दुसरा उपांत्य सामना महाराष्ट्र विरुद्ध आसाम यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात कर्णधार ऋतुराज गायकवाडने धावांची जादू कायम ठेवली आहे. या स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य फेरीतही त्याने चमकदार कामगिरी केली आहे. ऋतुराज गायकवाडने आसामविरुद्ध 126 चेंडूत 168 धावा केल्या. त्यामुळे महाराष्ट्र संघाने आसामसमोर 351 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. याआधी त्याने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात उत्तर प्रदेशविरुद्ध एकाच षटकात 7 षटकार मारून इतिहास रचला होता. अशी कामगिरी करणारा तो जगातील एकमेव खेळाडू ठरला. त्यानंतर त्याने आपल्या संघाला उपांत्य फेरीपर्यंत नेले.

आजच्या सामन्यात ऋतुराज गायकवाडच्या शतकाच्या जोरावर महाराष्ट्र संघाने 7 बाद 350 धावा केल्या. त्याचबरोबर आसाम संघासमोर 351 धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. गायकवाडने अवघ्या 88 चेंडूत ही कामगिरी केली आहे. शतक पूर्ण करण्यासाठी त्याने 88 चेंडूंचा सामना केला. यासोबतच त्याने 3 षटकार आणि 11 चौकारही लगावले. ऋतुराज गायकवाडच्या T20 कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर त्याने 90 सामन्यात 88 डावात 35 च्या सरासरीने 2836 धावा केल्या आहेत. यासोबतच ३ शतके आणि २० अर्धशतकेही झळकावली आहेत. दरम्यान त्याने 134 च्या स्ट्राईक रेटने 114 धावांची सर्वोच्च खेळी केली आहे. गायकवाड हा आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज संघाचा एक भाग आहे आणि संघाला चॅम्पियन बनवण्यातही त्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याने भारतासाठी एक वनडे आणि 9 टी-20 सामनेही खेळले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in