रायन रिकेल्टनचा गगनचुंबी षटकार अन् प्रेक्षकाला लागली लॉटरी; पकडला १.०७ कोटींचा कॅच, Video व्हायरल

गतविजेत्या MI केपटाऊन आणि डर्बन सुपर जायंट्स यांच्यातील पहिल्या सामन्यात विक्रमी धावसंख्या, तुफानी शतके आणि गगनचुंबी षटकार पाहायला मिळाले. परंतु धावांच्या त्सुनामीमध्ये एका प्रेक्षकाचे नशीब चमकले.
रायन रिकेल्टनचा गुगनचुंबी षटकार अन् प्रेक्षकाला लागली लॉटरी; पकडला १.०७ कोटींचा कॅच, video व्हायरल
रायन रिकेल्टनचा गुगनचुंबी षटकार अन् प्रेक्षकाला लागली लॉटरी; पकडला १.०७ कोटींचा कॅच, video व्हायरल
Published on

न्यूलँड्स येथे शुक्रवारी (दि.२६) दक्षिण आफ्रिका टी २० (SA20) लीगची सुरुवात झाली. गतविजेत्या MI केपटाऊन आणि डर्बन सुपर जायंट्स यांच्यातील पहिल्या सामन्यात विक्रमी धावसंख्या, तुफानी शतके आणि गगनचुंबी षटकार पाहायला मिळाले. परंतु धावांच्या त्सुनामीमध्ये एका प्रेक्षकाचे नशीब चमकले. प्रेक्षकाने स्टार फलंदाज रायन रिकेल्टनचा जबरदस्त कॅच एकहाती पकडला. यासाठी त्याला तब्बल १ कोटीपेक्षा जास्त रुपयांचे बक्षीस मिळाले. प्रेक्षकाचा कॅच पकडतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

SA20 सामन्यात एका प्रेक्षकाने जिंकले १.०७ कोटी रुपये!

२३३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या MI केपटाऊनचा स्टार फलंदाज रायन रिकेल्टने तुफान फटकेबाजी केली. १३ व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर रिकेल्टनने बुलेटच्या वेगाने गगनचुंबी षटकार मारला. तो चेंडू थेट स्टँडमध्ये गेला, तेव्हा एका प्रेक्षकाने कोणतीही चूक न करता एका हाताने जबरदस्त कॅच घेतला. प्रेक्षकाने चेंडू पकडताच स्टेडियममध्ये आनंदाची लाट उसळली. या कॅचमुळे प्रेक्षक एका रातोरात कोट्यधीश झाला. त्याला २ दशलक्ष रँड म्हणजेच १.०७ कोटी रुपये मिळाले.

'कॅच अ' मिलियन नियम म्हणजे काय?

SA20 मध्ये प्रेक्षकांसाठी व्यवस्थापनाने एक मजेदार नियम स्थापित केला आहे. ज्यामध्ये, "कॅच अ मिलियन" नियमानुसार, स्टँडमध्ये कोणत्याही प्रेक्षकाने एकहाती कॅच घेतल्यास त्याला हे बक्षीस देण्यात येईल. या शानदार कॅचसाठी, प्रेक्षकाला २ दशलक्ष रँड म्हणजेच भारतीय चलनानुसार १.०७ रुपये बक्षीस मिळतील.

डर्बन सुपर जायंट्सचा एमआय केपटाऊनवर दमदार विजय

शुक्रवारी (दि.२६) झालेल्या सामन्यात, प्रथम फलंदाजी करताना डर्बन सुपर जायंट्सने २० षटकांत ५ बाद २३२ धावा केल्या. ही SA20 लीगच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या होती. प्रत्युत्तरात, एमआयच्या फलंदाजांनी शेवटपर्यंत झुंज दिली. एमआय केपटाऊनच्या रायन रिकेल्टनने आघाडी घेत ६३ चेंडूत ११३ धावांची शानदार खेळी केली. ज्यामध्ये ५ चौकार आणि ११ षटकारांचा समावेश होता. जेसन स्मिथनेही १४ चेंडूत ४१ धावा करत शानदार खेळी केली. परंतु शेवटच्या षटकात परिस्थिती उलटली आणि डर्बन सुपर जायंट्सने एमआय केपटाऊनचा १५ धावांनी पराभव केला.

logo
marathi.freepressjournal.in