सचिन पुन्हा मैदानात परतणार!

रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज येत्या १० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत खेळवली जाणार आहे.
सचिन पुन्हा मैदानात परतणार!

क्रिकेटचा देश म्हणून ओळख असलेल्या 'मास्टर ब्लास्टर' सचिन तेंडुलकरने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅट मधून निवृती जाहीर करून बराच काळ लोटला. मात्र क्रिकेट प्रेमींमध्ये मराठमोळ्या तेंडुलकरची अजूनही तेवढीच क्रेझ आहे. सचिन मैदानात दिसताच प्रेक्षक त्याच्या नावाचा जयघोष करतात आता सचिन तेंडुलकर पुन्हा एकदा बॅट हातात घेणार आहे. तो रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या दुसऱ्या हंगामात पुन्हा एकदा सहभागी होण्याची शक्यता आहे. या आधीही त्याने पहिल्या हंगामात भारत लिजेंड्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते.

रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज येत्या १० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत खेळवली जाणार आहे. या सिरीजमध्ये जगभरातील दिग्गज क्रिकेटपटू सहभागी होतील. सचिन तेंडुलकर सोबतच युवराज सिंग देखील भारत लिजेंड्स संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसेल. सचिनने रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज च्या पहिल्या हंगामातही सहभाग नोंदवला होता. सचिन सोबत नमन ओझा, इरफान पठाण, युसुफ पठाण, राहुल शर्मा तसेच युवराज सिंगसह इतर खेळाडू देखील दिसतील.

या स्पर्धेच्या पहिल्या हंगामात एकूण सात संघाने सहभाग नोंदवला होता. यावर्षी न्युझीलँड लेजंडस या आणखी एका संघाचा समावेश होणार आहे.

म्हणजेच या हंगामात इंडिया लिजेंड्स, ऑस्ट्रेलिया लिजेड, श्रीलंका लीजेड, वेस्ट इंडिया लिजेंड्स, दक्षिण आफ्रिका लिजेंड्स, बांगलादेशी लिजेंड्स, इंग्लंड लिजेंड्स आणि न्यूझीलंड लिजेंड्स असे एकूण आठ संघ सहभागी होतील.

लिजेंड्स लीग मध्ये खेळण्याबाबत संभ्रम

सचिन तेंडुलकर रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज मध्ये खेळणार असला तरी १७ सप्टेंबर पासून रंगणाऱ्या लिजेंड्स लीग मध्ये तो खेळण्याची शक्यता धूसर आहे. १६ सप्टेंबर रोजी भारतीय महाराज आणि वर्ल्ड जायंट या संघात भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त विशेष सामना खेळवण्यात येणार आहे. बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली भारतीय महाराजाचे तर इआन मॅार्गन जागतिक संघाचे नेतृत्व करणार आहे. त्यानंतर लिजेंड्स लीगच्या साखळी सामन्यांना प्रारंभ होणार आहे. गतवर्षी सुद्धा सचिन या स्पर्धेत सहभागी झाला नव्हता. त्यामुळे चाहत्यांना तो यंदा तरी या स्पर्धेत खेळेल,अशी आशा होती.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in