सॅफ अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धा :भारत-बांगलादेश संयुक्त विजेते

असंख्य चाहत्यांच्या उपस्थितीत झालेल्या या सामन्यात भारताकडून शिबानी देवीने गोल नोंदवला.
सॅफ अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धा :भारत-बांगलादेश संयुक्त विजेते

ढाका : भारतीय मुलींच्या संघाने १९ वर्षांखालील सॅफ अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेचे संयुक्तपणे अजिंक्यपद पटकावले. अंतिम सामन्यात उभय संघांमध्ये १-१ अशी बरोबरी राहिली. त्यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्येही ११-११ अशी बरोबरी राहिली. अखेर दोन्ही संघांमध्ये प्रचंड गदारोळ झाल्यानंतर आयोजकांनी भारत-बांगलादेशला संयुक्तपणे विजेते घोषित केले.

असंख्य चाहत्यांच्या उपस्थितीत झालेल्या या सामन्यात भारताकडून शिबानी देवीने गोल नोंदवला. मग बांगलादेशकडून सागरिकाने बरोबरी साधली. त्यानंतर सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला. तिकडे दोन्ही संघांमध्ये बरोबरी कायम राहिली. अखेर सडन डेथमध्येही ११-११ अशी बरोबरी राहिल्याने पंचांनी नाणेफेकीच्या बळावर विजेता ठरवण्याचा निर्णय घेतला. मात्र यावेळी बांगलादेशचे खेळाडू व चाहत्यांनी हंगामा केला. तेथील चाहत्यांनी मैदानावर पाण्याच्या बाटल्या तसेच दगडांचा मारा केला. पंचांनी विजयी घोषित केल्यामुळे तसेच सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय खेळाडूंना ड्रेसिंग रूममध्ये धाव घेतली.

यानंतर जवळपास अर्धा तास बांगलादेशचे खेळाडू मैदानात ठाण मांडून होते. अखेर सामनाधिकाऱ्यांनी नियमांचा आढावा घेतल्यानंतर नाणेफेक अवैध ठरवली. त्यामुळे भारताला पुन्हा मैदानात बोलावण्यात आले. मात्र भारताचे खेळाडू मैदानात आले नाहीत. जवळपास तासभर प्रतीक्षा करूनही काहीच निष्पन्न झाल्याने अखेर आयोजकांनी दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्याचा निर्णय घेतला. मात्र या निर्णयामुळे सध्या सगळीकडे फुटबॉलच्या नियमांविषयी चर्चा रंगली आहे. तसेच आयोजकांवरही टाकी करण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in