सागर कातुर्डेची ‘स्पोर्टिका श्री’वर मोहोर

मेन्स फिजीक प्रकारात मन्सुरी शहा आणि कौतुक हडकर यांनी अव्वल स्थान पटकावले.
सागर कातुर्डेची ‘स्पोर्टिका श्री’वर मोहोर

सातारा : महाराष्ट्र बॉडीबिल्डर्स असोसिएशनच्या वतीने वाई येथे झालेल्या ‘स्पोर्टिका श्री’ राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेवर मुंबईच्या सागर कातुर्डेने आपले वर्चस्व प्रस्थापित करत गेल्या महिन्याभरात सलग आठवी स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला.

सागर कातुर्डेसाठी यंदाचे वर्ष नॉनस्टॉप यशाचे ठरले आहे. पिंपरी चिंचवड येथे झालेल्या दमदार आमदार श्रीपासून सुरू झालेला त्याचा जेतेपदाचा सिलसिला नागपूरच्या खासदार चषक, चेंबूर श्री, पोयसर जिमखाना श्री, अंधेरी श्री, सातारची बाळराजे श्री, कुर्ल्याची आमदार श्री आणि वाईची स्पोर्टिका श्रीपर्यंत नॉनस्टॉप आहे. विजेत्यांवर पुरस्कारांचा वर्षाव करणाऱ्या या स्पर्धेत सागरने हरमीत सिंग, उमेश गुप्ता, उदय देवरे यांच्यावर मात करत बाजी मारली. मुंबई उपनगरचा हरमीत सिंग उपविजेता ठरला. तसेच मेन्स फिजीक प्रकारात मन्सुरी शहा आणि कौतुक हडकर यांनी अव्वल स्थान पटकावले. स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा शरीरसौष्ठव संघटनेचे संजय मोरे, अजय खानविलकर, राजेश सावंत, विजय झगडे, मदन कडू, आयोजक संतोष शिंदे, संजय चव्हाण आणि संजय मालुसरे यांच्या उपस्थितीत पार पडला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in