
मुल्लनपूर : आयपीएलमधील शानदार कामगिरीमुळे इंग्लंडमधील पहिल्या कसोटी दौऱ्यापूर्वी भारताचा फलंदाज साई सुदर्शनचा आत्मविश्वास वाढला आहे. काऊंटी क्रिकेटमुळे माझ्या फलंदाजीतील प्राथमिक गोष्टीत सुधारणा झाल्याचे भारतीय संघाचा युवा फलंदाज सुदर्शन म्हणाला. आयपीएलचा यंदाचा हंगाम सुदर्शनसाठी स्वप्नवत राहिला. त्याने ५४.२१ च्या सरासरीने गुजरात टायटन्ससाठी ७५९ धावा जमवल्या. त्याचा संघ शुक्रवारी मुंबईविरुद्ध एलिमिनेटर लढतीत पराभूत झाला. त्यानंतर आता सुदर्शनचे लक्ष्य कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करण्याचे आहे.
हा डावखुरा फलंदाज इंग्लंड विरुद्ध ६ जूनपासून खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारत 'अ' संघातून खेळण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी हा खेळाडू इंग्लंडमधील काऊंटी क्रिकेटमध्ये सरेसाठी खेळला आहे. काऊंटी क्रिकेटमध्ये मी सरेसाठी ७ सामने खेळले आहेत. माझ्यासाठी हा मोठा अनुभव आहे. या सामन्यांतून माझ्या फलंदाजीतील तंत्रात सुधारणाझाली आहे. फलंदाजासाठी फलंदाजीतील प्राथमिक गोष्टी फारच महत्त्वाच्या असतात असे सुदर्शन म्हणाला. इंग्लंडमध्ये काऊंटी खेळल्याने माझ्या फलंदाजांनी बरीच सुधारणा झाल्याचे साई म्हणाला.
पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमधून लगेच बाहेर पडणे कठीण असते. मात्र २० जूनला पहिली कसोटीा असल्यामुळे त्या सामन्याच्या तयारीसाठी पुरेसा वेळ असल्याचे सुदर्शन म्हणाला.