साई सुदर्शनची श्रीलंका कसोटी मालिकेतून माघार

भारताचा युवा व प्रभावशाली फलंदाज बी. साई सुदर्शन याला पायाच्या अंगठ्याच्या दुखापतीतून अद्याप न सावरल्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे.
साई सुदर्शनची श्रीलंका कसोटी मालिकेतून माघार
साई सुदर्शनची श्रीलंका कसोटी मालिकेतून माघार
Published on

नवी दिल्ली: भारताचा युवा व प्रभावशाली फलंदाज बी. साई सुदर्शन याला पायाच्या अंगठ्याच्या दुखापतीतून अद्याप न सावरल्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे.

गेल्या महिन्यात भारत 'अ' संघाच्या श्रीलंका दौऱ्यादरम्यान दुसऱ्या सामन्यात सुदर्शनच्या पायाला दुखापत झाली होती. तेव्हापासून तो बंगळुरू येथील 'सेंटर ऑफ एक्सलन्स' मध्ये पुनर्वसन कार्यक्रमात सहभागी झाला आहे. खेळाडूंच्या पुनर्वसनावर लक्ष ठेवणाऱ्या 'स्पोर्ट्स सायन्स' टीमच्या माहितीनुसार, साई सुदर्शनची प्रकृती सुधारली असली तरी कसोटी क्रिकेटमध्ये सुरक्षित पुनरागमनासाठी वैद्यकीयदृष्ट्या त्याला आणखी काही काळाची गरज आहे.

दुखापत पुन्हा उफाळून येण्याचा किंवा गुंतागुंत वाढण्याचा धोका टाळण्यासाठी घाई न करता वैद्यकीय सल्ला देण्यात आला आहे. 'स्पोर्ट्स सायन्स' टीमने याबाबतची माहिती संघ व्यवस्थापन आणि राष्ट्रीय निवड समितीला दिली आहे.

भारत 'अ' कडून खेळताना दोन कसोटी सामन्यांत दोन शतके झळकावणाऱ्या शतक झळकावणारा देवदत्त पडिक्कल आता तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मुख्य सुदर्शनच्या अनुपस्थितीत, सराव सामन्यात दावेदार असेल. दरम्यान, सुदर्शनच्या जागी संघात कोणाला संधी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबईचा अनुभवी फलंदाज सर्फराझ खान हा या शर्यतीत एक पर्याय असू शकतो, मात्र प्रशिक्षक वर्ग आणि निवड समितीतील काही सदस्यांचा त्याच्यावर फारसा विश्वास नसल्याचे समजते.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in