भारताची 'फुलराणी' सांधेदुखीमुळे त्रस्त; सायना नेहवाल निवृत्तीच्या विचारात

भारताच्या या अव्वल बॅडमिंटनपटूला सांधेदुखीचा त्रास होत आहे. त्यामुळे तिला या वर्षीच्या अखेरपर्यंत तिच्या बॅडमिंटनमधील भविष्याबाबतचा निर्णय घ्यावा लागेल.
भारताची 'फुलराणी' सांधेदुखीमुळे त्रस्त; सायना नेहवाल निवृत्तीच्या विचारात
X
Published on

नवी दिल्ली : भारताची ऑलिम्पिक कांस्य पदकविजेती बॅडमिंटनपटू सायना नेहवालने तिच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती शेअर केली आहे. भारताच्या या अव्वल बॅडमिंटनपटूला सांधेदुखीचा त्रास होत आहे. त्यामुळे तिला या वर्षीच्या अखेरपर्यंत तिच्या बॅडमिंटनमधील भविष्याबाबतचा निर्णय घ्यावा लागेल. आजारपणामुळे तिला सराव करणं कठीण झालं आहे.

सायना ही बॅडमिंटनमध्ये भारतासाठी ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू आहे. तिने लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी कांस्यपदक जिंकलं होतं. तिने आतापर्यंत तीन वेळा ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. मात्र आता सांधेदुखीच्या त्रासामुळे ती निवृत्तीच्या विचारात आहे.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१० व २०१८ मध्ये तिने बॅडमिंटनच्या महिला एकेरी स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं होते.

logo
marathi.freepressjournal.in