सायना नेहवालची दमदार सुरुवात; अजिंक्यपद स्पर्धेत प्री-क्वार्टरफायनलमध्ये प्रवेश

३२ वर्षांच्या सायनाने यापूर्वी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्य आणि कांस्यपदक जिंकले होते
सायना नेहवालची दमदार सुरुवात; अजिंक्यपद स्पर्धेत प्री-क्वार्टरफायनलमध्ये प्रवेश

लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकाविणाऱ्या सायना नेहवालने बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत हाँगकाँगच्या चेऊंग ननाग यी हिचा सरळ दोन गेममध्ये पराभव करत दमदार सुरुवात केली. सायनाने ३८ मिनिटात चेऊंगला २१-१९, २१-०९ असे नमविले.

३२ वर्षांच्या सायनाने यापूर्वी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्य आणि कांस्यपदक जिंकले होते. तिने यंदाच्या बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत प्री-क्वार्टरफायनलमध्ये प्रवेश केला. दुसऱ्या फेरीतील सायना विरुद्ध खेळणाऱ्या नोझोमी ओकुहाराने दुखापतीमुळे स्पर्धेतूनच माघार घेतली. त्यामुळे बाय मिळालेल्या सायनाचा प्री-क्वार्टरफायनलचा मार्ग मोकळा झाला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in