लंडन : इंग्लंडचा कर्णधार तसेच धडाकेबाज फलंदाज जोस बटलर उजव्या पायाच्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेला मुकणार आहे. त्याच्या अनुपस्थितीत बटलरचाच सलामीचा साथीदार फिल सॉल्टकडे इंग्लंडच्या संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेला बुधवारपासून साऊदम्पटन येथे प्रारंभ होईल.
मिचेल मार्शच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया संघ सध्या युनायटेड किंगडमच्या दौऱ्यावर आहे. त्यांनी नुकताच स्कॉटलंडला टी-२० मालिकेत ३-० अशी धूळ चारली. आता इंग्लंडविरुद्धच्या ३ टी-२० सामन्यानंतर ते ५ एकदिवसीय लढतीही खेळणार आहेत. या मालिकेसाठी पॅट कमिन्सला विश्रांती देण्यात आली असून प्रामुख्याने नव्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.
दुसरीकडे बटलर एकदिवसीय मालिकेसही मुकण्याची शक्यता आहे. मात्र तूर्तास त्याविषयी निर्णय घेण्यात आलेला नाही.
वेळ : रात्री ११ वाजल्यापासून
थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स वाहिनी
इंग्लंड : फिल सॉल्ट (कर्णधार), जोफ्रा आर्चर, जेकब बीथेल, ब्रेडन कार्स, जॉर्डन कॉक्स, सॅम करम, जोश हल, विल जॅक्स, लियाम लिव्हिंगस्टोन, सकिब महमूद, डॅन मौसले, जेमी ओव्हर्टन, आदिल रशिद, रीस टॉप्ली, जॉन टर्नर.
ऑस्ट्रेलिया : मिचेल मार्श (कर्णधार), झेव्हिएर बार्टलेट, कूपर कोनोली, टिम डेव्हिड, नॅथन एलिस, जेक फ्रेसर-मॅकगर्क, कॅमेरून ग्रीन, आरोन हार्डी, जोश हेझलवूड, ट्रेव्हिस हेड, जोश इंग्लिस, स्पेन्सर जॉन्सन, मार्कस स्टोइनिस, ॲडम झाम्पा.