विम्बल्डनच्या मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीतुन सानिया पराभूत

तीन सेटमध्ये हा सामना जिंकण्यासाठी नील-क्राझेक जोडीला २ तास, १६ मिनिटे संघर्ष करावा लागला
 विम्बल्डनच्या मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीतुन सानिया पराभूत

मिश्र दुहेरीत दिमाखदार वाटचाल करणाऱ्या सानिया-पॅविक जोडीने उपांत्य लढतीतसुद्धा दमदार सुरुवात केली होती. परंतु ब्रिटनचा नील स्कूपी आणि अमेरिकेची डीझायर क्राझेक यांनी सानिया-पॅविक जोडीवर ४-६, ७-५, ६-४ अशी पिछाडीवरून सरशी साधत अंतिम फेरीत धडक मारली. तीन सेटमध्ये हा सामना जिंकण्यासाठी नील-क्राझेक जोडीला २ तास, १६ मिनिटे संघर्ष करावा लागला.

३५ वर्षीय सानियाने कारकीर्दीत दुहेरीतील सहा ग्रँड स्लॅम जेतेपद मिळवले. २०११, २०१३, २०१५मध्ये सानियाने विम्बल्डनच्या मिश्र दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. परंतु यंदा तिने त्यापेक्षाही एक पाऊल पुढे टाकले. २०१५मध्ये सानियाने महिला दुहेरीत विम्बल्डन स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला होता. परंतु विम्बल्डनच्या मिश्र दुहेरीत अशी कामगिरी करणे तिला २० वर्षांत जमले नाही. मिश्र दुहेरीत सानियाने २००९मध्ये ऑस्ट्रेलिया, २०१२मध्ये फ्रेंच, तर २०१४मध्ये अमेरिका ओपन स्पर्धा जिंकली आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in