सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा यांची ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत धडक

रोमहर्षक दुसऱ्या सेटमध्ये सानिया-रोहन जोडीला ६-७ अशा फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले. दुसरा सेट गमावल्यानंतर...
सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा यांची ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत धडक

सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा यांनी ऑस्ट्रेलियन ओपनच्या मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीत भारतीय जोडीने ग्रेट ब्रेटनच्या नील स्कुप्स्की आणि यूएसएचा डेसिरिया क्रॉझिक यांचा पराभव केला. सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा जोडीने 7-6(5) 6-7(5) 10-6 ने सामना जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला. टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा यांनी उपांत्य फेरीत आक्रमक सुरुवात केली होती. या जोडीने पहिला सेट ७-६ अशा फरकाने जिंकला. पण दुसऱ्या सेटमध्ये ग्रेट ब्रेटनचा नील स्कुप्स्की आणि यूएसएचा डेसिरिया क्रॉझिक यांनी धमाकेदार पुनरागमन केले. रोमहर्षक दुसऱ्या सेटमध्ये सानिया-रोहन जोडीला ६-७ अशा फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले.

दुसरा सेट गमावल्यानंतर भारतीय जोडीने जोरदार झुंज दिली. अंतिम तिसऱ्या सेटमध्ये सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा यांनी नील स्कुप्स्की आणि डेसिरिया क्रॉझिक यांना संधी दिली नाही. भारतीय जोडीने तिसरा सेट १०-६ अशा फरकाने एकतर्फी जिंकला. या विजयासह सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा यांनी ऑस्ट्रेलियन ओपनच्या मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in