अखिल भारतीय ग्रां.प्रि. बुद्धिबळ सीरिज : संजीव मिश्रा आघाडीवर

डावाच्या मध्यावरही संजीवचे पारडे जड होते. तथापि, २६व्या चालीतील गंभीर चूक त्याला भोवली.
अखिल भारतीय ग्रां.प्रि. बुद्धिबळ सीरिज : संजीव मिश्रा आघाडीवर

मुंबई : इंडियन चेस स्कूल आयोजित ३६० वन वेल्थ तिसऱ्या अखिल भारतीय ग्रां.प्रि. बुद्धिबळ सीरिजमध्ये सातव्या मानांकित संजीव मिश्राने अर्णव कोळी याचा पराभव करून सलग सहाव्या विजयासह सहाव्या फेरीअखेर ६ गुणांसह अव्वल स्थान पटकावले. सध्या जेतेपदासाठी तो प्रबळ दावेदार आहे.

अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ आणि महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशन यांच्या मान्यतेने सरू असलेल्या स्पर्धेत शनिवारी अग्रस्थानी असलेल्या संजीव आणि अर्णव यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. मिश्राने लंडन सिस्टिमचा अवलंब केला. त्याची चाल धोरणात्मक असूनही युवा खेळाडू अर्णवने त्याला तोडीस तोड प्रत्युत्तर दिले. डावाच्या मध्यावरही संजीवचे पारडे जड होते. तथापि, २६व्या चालीतील गंभीर चूक त्याला भोवली. त्याचा फायदा उठवत अर्णवने ३७ च्या चालीमध्ये विजयावर शिक्कामोर्तब केले. संजीव मिश्रापाठोपाठ अव्वल मानांकित आंतरराष्ट्रीय मास्टर विक्रमादित्य कुलकर्णीने सहाव्या मानांकित अर्णव खर्डेकरचा पराभव करून सलग चौथा विजय मिळवला. कुलकर्णीच्या विजयामुळे शेवटच्या फेरीत संजीव मिश्रासमोर कडवे आव्हान आहे. शेवटच्या फेरीत संजीव कुलकर्णी हा संजीवची विजयी मालिका खंडित करण्याचा प्रयत्न करेल. दुसरीकडे, विजेतेपद मिळवण्यासाठी संजीवला फक्त ड्रॉ आवश्यक आहे. विक्रमादित्य कुलकर्णीच्या खालोखाल अमरदीप बारटक्के, अर्णव कोळी, यश कापडी, सोहम पवार, दीपक सोनी आणि ध्रुव मुठे हे सहा खेळाडू दुसऱ्या स्थानी असून त्यांनाही जेतेपदासाठी संधी आहे.

logo
marathi.freepressjournal.in