पाकिस्तानने व्हाइटवॉश टाळला! पाचव्या लढतीत ४२ धावांनी सरशी; न्यूझीलंडचा मालिकेवर ४-१ असा कब्जा

लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा डाव १७.२ षटकांत ९२ धावांतच संपुष्टात आला.
पाकिस्तानने व्हाइटवॉश टाळला! पाचव्या लढतीत ४२ धावांनी सरशी; न्यूझीलंडचा मालिकेवर ४-१ असा कब्जा
Published on

ख्राईस्टचर्च : इफ्तिकार अहमदने (२४ धावांत ३ बळी) केलेल्या प्रभावी गोलंदाजीच्या बळावर पाकिस्तानने पाचव्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडचा ४२ धावांनी पराभव केला. त्यामुळे त्यांनी किमान व्हाइटवॉश टाळला. मात्र न्यूझीलंडने या मालिकेत ४-१ असे यश संपादन केले.

प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने २० षटकांत ८ बाद १३४ धावांपर्यंत मजल मारली. मोहम्मद रिझवान (३८ चेंडूंत ३८) आणि फखर झमान (१६ चेंडूंत ३३) यांच्याशिवाय कुणीही छाप पाडू शकले नाहीत. किवींसाठी टिम साऊदी, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन व ईश सोधी यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.

लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा डाव १७.२ षटकांत ९२ धावांतच संपुष्टात आला. शाहीन आफ्रिदी व मोहम्मद नवाझ यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवत इफ्तिकारला उत्तम साथ दिली. ग्लेन फिलिप्सने २६ धावांची एकाकी झुंज दिली. इफ्तिकार सामनावीर, तर पाच सामन्यांत १ शतकासह सर्वाधिक २७५ धावा करणारा फिन ॲलन मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

logo
marathi.freepressjournal.in