सौरभ तिवारीची क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्तीची घोषणा

सौरभने भारताकडून ३ एकदिवसीय सामने खेळले. तसेच २००८मध्ये युवा विश्वचषक जिंकणाऱ्या विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा तो भाग होता.
सौरभ तिवारीची क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्तीची घोषणा

जमशेदपूर : झारखंडचा ३४ वर्षीय डावखुरा फलंदाज सौरभ तिवारीने क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्ती जाहीर केली आहे. रणजी स्पर्धेत राजस्थानविरुद्ध १६ फेब्रुवारीपासून रंगणारा सामना हा कारकीर्दीतील अखेरचा असेल, असे सौरभने सांगितले. सौरभने भारताकडून ३ एकदिवसीय सामने खेळले. तसेच २००८मध्ये युवा विश्वचषक जिंकणाऱ्या विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा तो भाग होता. लांब केस आणि झारखंडचा असल्याने एकवेळ सौरभची पुढील महेंद्रसिंह धोनी म्हणून गणना केली जायची. आयपीएलमध्ये सौरभने मुंबई इंडियन्ससह एकूण चार संघांचे प्रतिनिधित्व केले. युवा खेळाडूंना संधी मिळावी तसेच आयपीएलमधील कामगिरीद्वारेही प्रभावित करण्यात अपयशी ठरत असल्याने आपण निवृत्ती पत्करत आहोत, असे सौरभ म्हणाला. त्याने १७ वर्षांच्या कालखंडता ११५ प्रथम श्रेणी सामन्यांत २२ शतकांसह ८,०३० धावा केल्या. तसेच त्याने ८८ सामन्यांत झारखंडचे नेतृत्वही केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in