पहिल्या टी-२० सामन्यात टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी यांची निवड

विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि पंत हे सध्या कसोटी सामना खेळत असल्याने त्यांना पहिल्या टी-२० सामन्यात विश्रांती देण्यात येणार आहे
पहिल्या टी-२० सामन्यात टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी यांची निवड

इंग्लंड आणि भारत यांच्यात ७ जुलैपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत प्रशिक्षक राहुल द्रविड पहिल्या टी-२० सामन्यात संघासोबत नसेल. त्यामुळे या पहिल्या टी-२० सामन्यात व्हीव्हीएस लक्ष्मण टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक असणार आहे. तसेच टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा असणार आहे.

विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि पंत हे सध्या कसोटी सामना खेळत असल्याने त्यांना पहिल्या टी-२० सामन्यात विश्रांती देण्यात येणार आहे. जूनच्या अखेरीस टीम इंडियाने आयर्लंडचा दौरा केला. भारताने या मालिकेत आयर्लंडला क्लीन स्वीप दिला. त्या दौऱ्यावर टीम इंडियाचे प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण हे होते.

पहिल्या टी-२० साठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिष्णोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in