दुलीप क्रिकेट ट्रॉफीसाठी पश्चिम विभागाच्या संघात ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जैस्वालची निवड

भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जात असून 12 जुलैपासून डॉमिनिका येथे पहिली कसोटी सुरू होणार
दुलीप क्रिकेट ट्रॉफीसाठी पश्चिम विभागाच्या संघात ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जैस्वालची निवड
Published on

आयपीएलमध्ये दमदार फलंदाजी करणाऱ्या ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जैस्वाल या दोन्ही सलामीवीरांची 28 जूनपासून सुरू होणाऱ्या दुलीप क्रिकेट ट्रॉफीसाठी पश्चिम विभागाच्या संघात निवड झाली आहे.

भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जात असून 12 जुलैपासून डॉमिनिका येथे पहिली कसोटी सुरू होणार आहे. दोन्ही संघामध्ये दुसरी कसोटी २० ते २४ जुलै दरम्यान खेळवली जाणार आहे. दुलीप करंडक स्पर्धा २८ जून ते १६ जुलै या कालावधीत होणार आहे. ऋतुराज आणि यशस्वी या दोघांची पश्चिम विभागाच्या संघात निवड झाली असल्याने त्यांची निवड भारताच्या कसोटी संघात होण्याची शक्यता नाही.

आयपीएलमध्ये चांगली फलंदाजी करणाऱ्या पृथ्वी शॉ आणि सर्फराज खानला संधी देण्यात आली आहे. दोघांनाही पश्चिम विभागाच्या संघात स्थान देण्यात आले आहे. मुंबईतील शम्स मुलाणीचीही निवड झाली आहे. प्रियांक पांचाळ यांच्याकडे पश्चिम विभागाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in