नवी मुंबई प्रीमियर क्रिकेट लीगसाठी आजपासून निवड चाचणी

फेब्रुवारीत एनएमपीएलचा दुसरा हंगाम रंगणार आहे. दादोजी कोंडदेव स्टेडियम आणि डी. वाय. पाटील स्टेडियम येथे स्पर्धेचे सामने होतील.
नवी मुंबई प्रीमियर क्रिकेट लीगसाठी आजपासून निवड चाचणी

ठाणे : माझगाव क्रिकेट क्लब आयोजित दुसऱ्या नवी मुंबई प्रीमियर क्रिकेट लीगसाठी (एनएमपीएल) नोंदणी केलेल्या खेळाडूंची निवड चाचणी बुधवार, १७ जानेवारीपासून सुरू होणार आहे. तीन दिवस होणाऱ्या या निवड चाचणीद्वारे पात्र ठरलेले खेळाडू ८ संघांत विभागले जातील. फेब्रुवारीत एनएमपीएलचा दुसरा हंगाम रंगणार आहे. दादोजी कोंडदेव स्टेडियम आणि डी. वाय. पाटील स्टेडियम येथे स्पर्धेचे सामने होतील. दरम्यान, निवड चाचणी सिडको मैदान, पाली कळंबोली, प्लॉट नंबर २ येथे सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत होईल. अधिक माहितीसाठी ९८६७६९८१२२ या क्रमांकावर संपर्क साधावा.

logo
marathi.freepressjournal.in