ज्येष्ठ भारतीय हॉकीपटू वरिंदर सिंग यांचे जालंधरमध्ये निधन

हॉकी इंडियाने ट्वीट करून त्यांच्या निधनाची माहिती दिली
ज्येष्ठ भारतीय हॉकीपटू वरिंदर सिंग यांचे जालंधरमध्ये निधन

ज्येष्ठ भारतीय हॉकीपटू वरिंदर सिंग यांचे मंगळवारी जालंधरमध्ये निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. हॉकी इंडियाने ट्वीट करून त्यांच्या निधनाची माहिती दिली.

भारतीय हॉकीला आंतरराष्ट्रीय स्तरावर लौकिक मिळवून देणाऱ्या पंजाब आणि हरियाणामधील अनेक खेळाडूंपै्ी ऑलिंपिक पदक विजेते आणि विश्वचषक विजेत वरिंदर सिंग हे एक होते.

वरिंदर सिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना हॉकी इंडियाने म्हटले आहे की, वरिंदर सिंग यांनी मिळविलेले यश जगभरातील हॉकी समुदाय स्मरणात ठेवेल. वरिंदर सिंग हे १९७५ मध्ये क्वालालंपूर येथे झालेल्या पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघाचा भाग होते. या स्पर्धेत भारताचे ते पहिले आणि एकमेव सुवर्णपदक ठरले होते. त्या वेळी भारतीय हॉकी संघाने अंतिम फेरीत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा २-१ असा पराभव केला होता. याशिवाय, वरिंदर सिंग हे १९७२ च्या म्युनिक ऑलिंपिकमध्ये कांस्यपदक विजेत्या संघाचाही भाग होते. १९७३ मधील अॅमस्टरडॅम विश्वचषकात रौप्यपदक जिंकणाऱ्या भारतीय संघातही ते होते. १९७४ आणि १९७८ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही त्यांना रौप्यपदक मिळविण्याची संधी मिळाली होती. २००७ मध्ये भारतीय हॉकीतील योगदानासाठी वरिंदर सिंग यांना प्रतिष्ठित ध्यानचंद जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in