WPL Auction 2023 : शफाली वर्माचे उजळले नशीब; दिल्लीने लावली इतक्या कोटींची बोली

१९ वर्षांखालील भारतीय महिला क्रिकेट संघाला (WPL Auction 2023) विश्वचषक जिंकून देणारी कर्णधार शफाली वर्मावरही लागली करोडोंची बोली
WPL Auction 2023 : शफाली वर्माचे उजळले नशीब; दिल्लीने लावली इतक्या कोटींची बोली

अगदी काही दिवसांपूर्वीच १९ वर्षांखालील भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकून जागतिक पातळीवर वाहवाही मिळवली होती. या १९ वर्षांखालील विश्वचषकात तडाखेबाज फलंदाजी आणि उत्तम कर्णधारपद भूषवणारी शफाली वर्मा आता महिलांच्या आयपीएल लिलावामध्येही स्टार ठरली आहे.

महिला प्रीमिअर लीग २०२३ साठी सुरु असलेल्या लिलावामध्ये तिच्यावर २ कोटींची बोली लावत दिल्ली कॅपिटल्सने आपल्या संघात तिचा समावेश करून घेतला. तिने भारतीय महिला क्रिकेटमध्येही सलामीला येऊन आपली भूमिका बजावली आहे. आत्तापर्यंत तिने ५२ टी-२० सामन्यात २४.७८ च्या सरासरीने १२६४ धावा केल्या आहेत. यामध्ये ५ अर्धशतकांचाही समावेश आहे. तसेच तिने २१ एकदिवसीय सामन्यांमध्ये ५३१ धावा केल्यापासून यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in