विश्वचषक अंतिम संघामध्ये स्थान मिळवण्यासाठी शमीला करावे लागणार स्वतःला सिद्ध

विश्वचषक सुरू होण्याच्या एक आठवड्यापूर्वी संघात बदल केले जाऊ शकतात आणि राखीव खेळाडूंना संघात स्थान दिले जाऊ शकते.
विश्वचषक अंतिम संघामध्ये स्थान मिळवण्यासाठी शमीला करावे लागणार स्वतःला सिद्ध
Published on

मोहम्मद शमी हा भारतीय क्रिकेट संघातील सध्याचा अनुभवी गोलंदाज आहे. शमीमध्ये केवळ डावाच्या सुरुवातीलाच नव्हे तर डेथ ओव्हर्समध्येही गोलंदाजी करण्याची ताकद आहे. पण युवा संघात सामील झाल्यानंतर हळूहळू मागे पडत चाललेला शमी टी-२० विश्वचषकासाठी जाहीर झालेल्या संघातही नसल्याचं नुकतंच समोर आलं आहे. मात्र शमी यंदाच्या टी-२० विश्वचषकात खेळू शकतो, अशी शक्यता आहे. हे शमीच्या खेळावर आणि बीसीसीआयच्या निर्णयावर अवलंबून आहे.

भारत आता आगामी T20 विश्वचषक 2022 आधी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) विरुद्ध टी-20 मालिका खेळणार आहे. वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियासाठी हे एक प्रकारचे रंगतदार प्रशिक्षण असणार आहे. या दोन्ही दौऱ्यांसाठी मोहम्मद शमी संघात आहे. त्यामुळे विश्वचषकापूर्वी शमी कशी कामगिरी करतो याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. विश्वचषक सुरू होण्याच्या एक आठवड्यापूर्वी संघात बदल केले जाऊ शकतात आणि राखीव खेळाडूंना संघात स्थान दिले जाऊ शकते. त्यामुळे शमीने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चांगली कामगिरी केल्यास त्याला विश्वचषक संघात स्थान मिळू शकते. 

सध्या निवडलेला भारतीय संघ असा आहे 

T20 विश्वचषकासाठी भारतीय संघाचा विचार करता रवींद्र जडेजाच्या दुखापतीमुळे अक्षर पटेलला संधी देण्यात आली आहे. त्याशिवाय बुमराह आणि हर्षल पटेल हे दुखापतीतून बरे झाल्याने संघात परतले आहेत. डावखुरा वेगवान गोलंदाज म्हणून अर्शदीपलाही संघात स्थान देण्यात आले आहे. 

T20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल. 

राखीव खेळाडू 

मोहम्मद शमी, दीपक चहर, रवी बिश्नोई आणि श्रेयस अय्यर

logo
marathi.freepressjournal.in