टी-२० विश्वचषक सामन्याची क्रेझ शिगेला,तीन महिन्यांआधीच स्टेडियम हाऊसफुल्ल

ऑस्ट्रेलियात १६ ऑक्टोबरपासून टी-२० विश्वचषक स्पर्धेला सुरूवात होत आहे.
टी-२० विश्वचषक सामन्याची क्रेझ शिगेला,तीन महिन्यांआधीच स्टेडियम हाऊसफुल्ल

ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध आहे. दिवाळीच्या एक दिवस आधी म्हणजे २३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या सामन्याची क्रेझ शिगेला पोहोचली असून सर्व तिकिटांची आताच विक्री झाली आहे. तीन महिन्यांआधीच स्टेडियम हाऊसफुल्ल झाले आहे. आजपासूनच हा सामना हाऊसफुल्ल झाला आहे. टुरिझम ऑस्ट्रेलियाने याबाबतची माहिती दिली.

ऑस्ट्रेलियात १६ ऑक्टोबरपासून टी-२० विश्वचषक स्पर्धेला सुरूवात होत आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना १३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यापाठोपाठ भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्याच्या तिकिटांची मागणी सर्वाधिक आहे.

याआधी, आशिया चषक स्पर्धेत धेतही भारत आणि पाकिस्तान यांच्यातही सामना होणार आहे. आशिया चषक यावेळी श्रीलंकेत होणार आहे. या स्पर्धेचे वेळापत्रक अद्याप जाहीर व्हायचे आहे. दरम्यान, ग्लोबल स्पोर्ट्स ट्रॅव्हल कंपनीने माहिती दिली की, भारतात आतापर्यंत ४० टक्के पॅकेजेस खरेदी करण्यात आल्या आहेत. २७ टक्के पॅकेजेस उत्तर अमेरिकेत, १९ टक्के ऑस्ट्रेलियात आणि १५ टक्के इंग्लंडसह इतर देशांमध्ये खरेदी करण्यात आली आहे. मेलबर्नमधील हॉटेलच्या खोल्या आधीच बूक केल्या आहेत. भारत-पाकिस्तान सामन्यासाठी मेलबर्नमध्ये ४५ ते ५० हजार चाहते येण्याची अपेक्षा आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in