शिखर धवनचा कायदेशीर कारवाईचा इशारा; वर्ल्ड टी-२० कॉन्टिनेंट कपमध्ये परवानगीशिवाय नाव वापरल्याचा आयोजकांवर आरोप

भारताचा माजी सलामीवीर शिखर धवनने ‘वर्ल्ड टी-२० कॉन्टिनेंट कप’च्या आयोजकांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. आपली परवानगी न घेता स्पर्धेतील सहभागी खेळाडूंच्या यादीत नाव समाविष्ट करण्यात आल्याचे धवनने म्हटले आहे.
शिखर धवनचा कायदेशीर कारवाईचा इशारा; वर्ल्ड टी-२० कॉन्टिनेंट कपमध्ये परवानगीशिवाय नाव वापरल्याचा आयोजकांवर आरोप
शिखर धवनचा कायदेशीर कारवाईचा इशारा; वर्ल्ड टी-२० कॉन्टिनेंट कपमध्ये परवानगीशिवाय नाव वापरल्याचा आयोजकांवर आरोपसंग्रहित छायाचित्र
Published on: 

नवी दिल्ली : भारताचा माजी सलामीवीर शिखर धवनने ‘वर्ल्ड टी-२० कॉन्टिनेंट कप’च्या आयोजकांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. आपली परवानगी न घेता स्पर्धेतील सहभागी खेळाडूंच्या यादीत नाव समाविष्ट करण्यात आल्याचे धवनने म्हटले आहे.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपण कोणतीही संमती दिलेली नाही किंवा आपल्या नावाच्या वापरास परवानगी दिलेली नाही, असे धवनने स्पष्ट केले. तसेच, आपल्या सहभागाबाबत आयोजकांनी केलेल्या अनधिकृत घोषणांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्याने केले आहे.

“वर्ल्ड टी-२० कॉन्टिनेंट कपमध्ये सहभागी खेळाडू म्हणून माझे नाव असल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे. माझ्या माहितीशिवाय किंवा परवानगीशिवाय आयोजकांनी माझ्या नावाचा वापर केला आहे. या प्रकरणी योग्य ती कायदेशीर पावले माझी टीम उचलणार आहे,” असा इशारा त्याने दिला आहे.

आयोजकांकडून स्पष्टीकरण नाही

वर्ल्ड टी-२० कॉन्टिनेंट कपमधील सहभागाबाबत धवनने स्पष्ट नकार दिला असला, तरी आयोजकांकडून यासंदर्भात अधिकृत स्पष्टीकरण किंवा पुढील कायदेशीर घडामोडींची माहिती या वृत्तात देण्यात आलेली नाही. धवनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याने १६७ सामन्यांत ६,७९३ धावा केल्या असून, त्यात १७ शतके आणि ३९ अर्धशतकांचा समावेश आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in