शिखर धवन आयसीसी वन-डे क्रमवारीत तेराव्या स्थानावर

दोन अर्धशतकी खेळी करणारा श्रेयस अय्यर देखील २० स्थानांनी मुसंडी मारत संयुक्तरीत्या ५४व्या स्थानावर पोहोचला
शिखर धवन आयसीसी वन-डे क्रमवारीत तेराव्या स्थानावर

भारताच्या वन-डे संघाचा काळजीवाहू कर्णधार शिखर धवन आयसीसी वन-डे क्रमवारीत तेराव्या स्थानावर पोहोचला. शिखरने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वन-डे सामन्यात ९७ धावांची सामना जिंकून देणारी खेळी केली होती. याचबरोबर पाठोपाठ दोन अर्धशतकी खेळी करणारा श्रेयस अय्यर देखील २० स्थानांनी मुसंडी मारत संयुक्तरीत्या ५४व्या स्थानावर पोहोचला.

आयसीसी वन-डे क्रमवारीत भारताचा गोलंदाज मोहम्मद सिराजलादेखील पहिल्या १०० जणांमध्ये स्थान मिळाले. तो आता ९७व्या स्थानावर आला. त्याने विंडीजविरुद्धच्या पहिल्या वन-डे सामन्यात ५७ धावा देत दोन विकेट्स घेतल्या होत्या. वेस्ट इंडिज दौऱ्यावर विश्रांती देण्यात आलेल्या विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या वन-डे क्रमवारीत घसरण झाली. विराट पाचव्या तर रोहित सहाव्या स्थानावर घसरला.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in