माऊंट एव्हरेस्ट चषक स्पर्धेत शिवांशची रौप्य,सोनियाची कांस्यकमाई

या स्पर्धेत पुनीत बालन ग्रुपचे सहाय्य असणाऱ्या या दोन्ही खेळाडूंनी पदकाला गवसणी घातली.
माऊंट एव्हरेस्ट चषक स्पर्धेत शिवांशची रौप्य,सोनियाची कांस्यकमाई

जी-२ दर्जाच्या तिसऱ्या माऊंट एव्हरेस्ट चषक खुल्या तायक्वांदो स्पर्धेत पुनीत बालन ग्रुपच्या शिवांश त्यागीने रौप्यपदकावर नाव कोरले. तर सोनिया भारद्वाजने कांस्यपदकाची कमाई केली. या स्पर्धेमुळे दोन्ही खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रमवारीत मोठी झेप घेणार आहेत.

नेपाळ येथील पोखरा येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पुनीत बालन ग्रुपचे सहाय्य असणाऱ्या या दोन्ही खेळाडूंनी पदकाला गवसणी घातली. शिवांश त्यागीने आपल्या सर्वच लढतीमध्ये दमदार खेळाचे प्रदर्शन करताना आपल्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत केले. अंतिम लढतीत भारताच्या खेळाडूकडून पराभूत व्हावे लागल्याने शिवांशला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. सोनिया भारद्वाजनेदेखील चमकदार कामगिरी बजावताना कांस्यपदक पटकावले. सोनियाला दुसऱ्या उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. तत्पूर्वी झालेल्या सर्व लढतीत सोनियाने आक्रमक खेळ करताना प्रतिस्पर्ध्यांना नॉकआऊट केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in