विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामन्याविषयी शोएब अख्तरचं मोठं विधान ; म्हणाला, "पाकिस्तान भारताचा..."

गुजरातमधील अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर १४ ऑक्टोबर रोजी हा सामना खेळला जाणार आहे
विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामन्याविषयी शोएब अख्तरचं मोठं विधान ; म्हणाला, "पाकिस्तान भारताचा..."

यंदा भारतात होणाऱ्या क्रिकेट विश्वचषकाला ५० दिवसांपेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. वर्ल्डकपमधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची क्रिकेटप्रेमी उत्सूकतेने वाट बघत आहेत. गुजरातमधील अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर १४ ऑक्टोबर रोजी हा सामना खेळला जाणार आहे. आता या सामान्यापूर्वी भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघातील माजी खेलाडूंनी आपापली मते व्यक्त केली आहे. यापैकी पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने केलेल्या विधानाची जोरदार चर्चा सुरु आहे. विश्वचषकात पाकिस्तान भारताचा पराभव करेल, असा विश्वास शोएब अख्तरने व्यक्त केला आहे.

विश्वचषकाच्या इतिहासात आतापर्यंत भारताने बाजी मारलेली आहे. एकदिवशीय विश्वचषकात आतापर्यंत पाकिस्तानला भारताचा पराभव करता आलेला नाही. मोठ्या सामन्यात दबाव झेलण्याची पाकिस्तानच्या संघाची मजबूत बाजू असल्याचं शोएबने म्हटलंय. शोएबने रेव स्पोर्ट्स संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तानच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. पहिल्यांदा प्रत्येकवेळी काहीना काही होतंच. भारतीय संघावर वारंवार जिंकण्याचा दबाव आहे. त्यामुळे या स्थितीत भारताचा पराभव करण्याची पाकिस्तानकडे मोठी संधी असल्याचं शोएब म्हणाला आहे.

विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होणार आहे. त्यापूर्वी श्रीलंकेत याची रंगीत तालिम पाहायला मिळणार आहे. आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात श्रीलंकेतील पल्लेकेले स्टेडिअमवर ही लढत होणार आहे. या चषकात हो दोन्ही संघ एकाच ग्रृपमध्ये असून या दोन्ही संघात दोन सामने होणार आहेत. भारतीय संघाची आशिया चषकासाठी निवड अद्याप झाली नसून पाकिस्तानच्या संघाची घोषणा मात्र झाली आहे. २० ऑगस्ट रोजी भारतीय संघाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

logo
marathi.freepressjournal.in